चंद्रपूर: सिंदेवाही तालुक्यातील मोहाळी गावात घुसून दोन बछड्यांसह मादी बिबट्याने धुमाकूळ घालत कहर केला आहे. बछड्यांसह मादी बिबट्याने गावातील सहा जणांवर हल्ला करून जखमी केले आहे. त्यानंतर शानबा बारेकर यांच्या घरात ठाण मांडले होते. दरम्यान वनविभागाच्या बचाव पथकाने बारेकार यांच्या घरात ठाण मांडलेल्या मादी बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले असून दोन बछड्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहे. जखमीमध्ये विजय देवगिरीकर (३५), मनोहर दांडेकर (५०), जितेंद्र दांडेकर (३०), सुभाष दांडकर (२५), रितीक वाघमारे (१८), पांडूरंग नन्नावारे (३२) यांचा समावेश आहे.

मोहाळी गावात दोन बछड्यांसह आलेल्या मादी बिबटने कहर केला. ही मादी बिबट बछड्यांसह शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास गावात शिरले. या तिघांनीही चांगला धुमाकूळ घातला. यामध्ये सहा जणांना जखमी करून गावातील शानबा बारेकर यांच्या घरात आश्रय घेतला. ही बाब माहिती होताच गावकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे.

Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
After Diwali municipalitys secondary division school timings changed again
माध्यमिक शाळांच्या वेळेत दिवाळी सुट्टीनंतर बदल, माध्यमिक शाळा पूर्वीप्रमाणेच सकाळी ८ ते २ या वेळेत
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त
Vasai alarm ATM center, alarm ATM, Vasai,
एटीएम केंद्रातील अलार्मचा ५ तास नागरिकांना मनस्ताप
Process of house sale by developer without lot Mumbai news
सोडतीविनाच विकासकाकडून घरविक्रीची प्रक्रिया?
accused absconded from Ajani police station
नागपूर : आजनी पोलीस ठाण्यातून आरोपी पसार

हेही वाचा : Amravati update : आधी दुचाकीने धडक, नंतर चाकूने भोसकून हत्‍या…

घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी बचाव पथकास मादी बिबट व तिच्या बछड्यांना रेस्क्यू करण्यासाठी दाखल झाले होते. शानबा बारेकर यांच्या घरात दडून बसलेल्या बिबट्याला वनविभागाच्या बचाव पथकाने रेस्स्कू करून सुखरूप जेरबंद केले आहे. मादी बिबट्याच्या दोन बछड्यांना पकडण्यासाठी वनविभागाचे पथक तारेवरची कसरत करीत होते.

वृत्त लिहेत्तोवर बछड्यांना जेरबंद करण्यात आले नव्हते. यादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सिंदेवाही पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. जखमींना सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा : VIDEO : जेसीबीत बसून गर्भवतीने ओलांडला नाला, निकृष्ट रस्त्यांमुळे दुर्गम भामरागड तालुक्यातील नागरिकांचा जीव धोक्यात

बिबट व वाघांचे हल्ले या भागात वाढल्याने जंगलगतच्या गावांमध्ये दहशत आहे. मानव – वन्य जीव संघर्षामुळे परिसरातील नागरिकांनी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात सध्या पेरणीचा हंगाम सुरू आहे. शेतकरी भाताच्या पेरणीसाठी शेतात जातात. नेमका त्याच वेळी वाघ हल्ला करतात. अशा वेळी अनुचित घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता वाघाचा बंदोबस्त करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.