चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघ बघण्याच्या घाईत वेग मर्यादा ओलांडून वेगाने जिप्सी चालवून झाडाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन पर्यटक जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारच्या सत्रात देवाडा – आगरझरी परीसरात घडली. जखमी झालेल्या पर्यटकांमध्ये चंद्रपूर शहरातील राजू चौधरी, मनीष मंडल या दोघांचा समावेश आहे.
हेही वाचा : ‘हनीट्रॅप’ प्रकरण : नागपुरातील काही पत्रकार पोलिसांच्या ‘रडार’वर!
या प्रकरणी ताडोबा व्यवस्थापनाने जिप्सी चालक सूरज ढोक यांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला आहे. तर गाईड अर्जुन कुमरे यांच्यावर एक महिन्यासाठी कारवाई केली आहे. ताडोबात वाघ बघण्यासाठी पर्यटकांमध्ये जोरदार स्पर्धा असते. जिप्सी चालक तथा गाईड यांना वारंवार सूचना देऊन देखील नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे आता ताडोबा व्यवस्थापन कठोर पावले उचलत आहेत.