चंद्रपूर : रक्तदान हे पवित्र दान आहे. या दानातून अनेकांचे प्राण आपण वाचवू शकतो. कोरोना काळात रक्तदान आणि ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना कळल आहे. त्यामुळेच समाजसेवी संस्था, राजकीय नेते एवढेच नाही तर गाव पातळीवर सुद्धा रक्तदान शिबिरे घेतली जातात. मात्र या पवित्र रक्तदान शिबिरातील एक विडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.भाजपाच्या एका नेत्यांची रक्तदान शिबिरात कार्यकर्त्यांनी रक्ततुला केली.देवराव भोंगळे असे या नेत्याचे नाव आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ते जवळचे म्हणून ओळखले जातात. रक्ततुलासाठी रक्ताच्या पिशव्या डोनेट ब्लड बँक मध्येच ठेवल्या गेल्या होत्या. ज्यांनी रक्तदान केलं त्यांचे हे दान या प्रकाराणे वाया जाणार नाही असं वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासकांचे मत आहे.कार्यकर्त्यांनी हा प्रकार केवळ प्रेमातून केला हे खरे मात्र याची खरच गरज होती काय ? हा खरा प्रश्न आहे.

हेही वाचा : राज्यातील “या” २५ जिल्ह्यांना “यलो अलर्ट”, पुन्हा अवकाळी पावसाचे वातावरण

Kasba Constituency, Ravindra Dhangekar,
विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे : रविंद्र धंगेकर
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
bjp leader shivray Kulkarni
भाजपचे नाव घेणाऱ्यांनी गल्लीबोळात भाजपविरोधात बैठकी…भाजप प्रवक्त्यांच्या आरोपामुळे…
guruji Nitesh Karale concern over giving opportunity to mp Kale wife Mayura Kale in Maharashtra
Video : कराळे गुरूजींची स्वपक्षीय खासदाराबद्दल ‘खदखद’,काय म्हणाले  ?
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’

भाजपाचे राजुरा विधानसभा निवडणूक प्रमुख देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्ह्यातील राजुरा शहरात करण्यात आले होते. कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केलं.अतिउत्साही कार्यकर्त्यांनी या शिबिरात मोठा तराजू आणून एका बाजुला नेत्याला व दुसर्या बाजुला एका बॉक्समध्ये रक्ताच्या पिशव्या ठेवून रक्ततुला केली.वजन कमी भरल्यान बॉक्सच्या वरती रक्ताच्या पिशव्या ठेवण्यात आल्या होत्या. हा प्रकार जिल्ह्यातील राजुरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज संकुल येथे घडला. या प्रकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमात वायरल झाल्याने पवित्र रक्तदानाचे अश्या प्रकारे इव्हेंट नको होतं अशी टीका केली जात आहे.

राजुरा विधानसभेतील आमदारकी मिळवण्यासाठी देवराव भोंगळे प्रयत्नात आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळातून ऐकू येतेय. गावागावात शहरात त्यांनी जनसंपर्क वाढवला आहे. विविध कार्यक्रमाच्या त्यांनी सपाटा लावला आहे.मात्र वायरल झालेल्या व्हिडिओमुळे भोंगळे यांच्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे.