चंद्रपूर : रक्तदान हे पवित्र दान आहे. या दानातून अनेकांचे प्राण आपण वाचवू शकतो. कोरोना काळात रक्तदान आणि ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना कळल आहे. त्यामुळेच समाजसेवी संस्था, राजकीय नेते एवढेच नाही तर गाव पातळीवर सुद्धा रक्तदान शिबिरे घेतली जातात. मात्र या पवित्र रक्तदान शिबिरातील एक विडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.भाजपाच्या एका नेत्यांची रक्तदान शिबिरात कार्यकर्त्यांनी रक्ततुला केली.देवराव भोंगळे असे या नेत्याचे नाव आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ते जवळचे म्हणून ओळखले जातात. रक्ततुलासाठी रक्ताच्या पिशव्या डोनेट ब्लड बँक मध्येच ठेवल्या गेल्या होत्या. ज्यांनी रक्तदान केलं त्यांचे हे दान या प्रकाराणे वाया जाणार नाही असं वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासकांचे मत आहे.कार्यकर्त्यांनी हा प्रकार केवळ प्रेमातून केला हे खरे मात्र याची खरच गरज होती काय ? हा खरा प्रश्न आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा