चंद्रपूर : आगामी लोकसभा निवडणुकीत ओबीसी व दलित समाजाची मते भाजपाकडे आकर्षित करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘घर चलो अभियाना’ची सुरुवात रिपाइंचे ज्येष्ठ नेते व्ही.डी. मेश्राम व कुणबी समाजाचे अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम सातपुते यांच्या घरून केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुस्लीम समाज भाजपापासून दुरावला असल्याने समाजातील इतर घटकांना सोबत घेण्यासाठी भाजपाने ‘घर चलो अभियाना’ची सुरुवात चंद्रपुरातून केली. भाजपाच्या राज्यव्यापी लोकसभा प्रवासाअंतर्गत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या सोबतीने शहरात अभियान सुरू केले. दलित व ओबीसी समाजाच्या मतांवर लक्ष ठेवून असलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्षांनी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते व रिपब्लिकन नेते प्रा. बी.डी. मेश्राम यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांना मोदी सरकारच्या नऊ वर्षांचा कार्यकाळ व कार्यपद्धतीची माहिती दिली.

हेही वाचा – मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक शुल्कात दुप्पट वाढ!; सामान्य विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती

हेही वाचा – नागपंचमी विशेष : अडीच दशकांत तब्बल २० हजार सापांना जीवदान, वन्यजीवरक्षकाची कर्करोगावर मात करून सर्पसेवा

प्रा. मेश्राम यांनी संविधानाची प्रत सस्नेह भेट दिली. ही भेट मला कायम स्मरणात राहील, अशी भावना बावनकुळे यांनी व्यक्त केली. त्यानंतर बावनकुळे यांनी अखिल भारतीय धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम सातपुते यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने मागील नऊ वर्षांत राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देत संवाद साधला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chandrapur chandrasekhar bawankule started the ghar chalo abhiyaan and met senior leader meshram and kunbi caste president purushottam satpute rsj 74 ssb