चंद्रपूर: मुख्यमंत्री झाल्या नंतर प्रथमच चंद्रपूर शहरात आलोय आणि या दौ-याची सुरवात माता महाकालीच्या दर्शनाने होणे हा शुभसंकेत आहे. काम करत असतांना शक्तीचा आर्शिवाद महत्वाचा आहे. मातेची ईच्छा असेल तर ठरविल्या पेक्षा मोठे काम येथे होणार, आपण पाठपूरावा करुन मंदिर परिसर विकासाचा कार्यक्रम पुर्ण करु असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दरम्यान मंदिर परिसर विकासासाठी २५० कोटीचा निधी मंजूर असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

मा. सां. कन्नमवार रौप्य महोत्सव कार्यक्रमानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शुक्रवारी चंद्रपूर दौ-यावर होते. यावेळी भारतीय जनता पक्ष आणि श्री महाकाली माता महोत्सव समीतीच्या वतीने महाकाली मंदिर येथे मुख्यमंत्री यांच्या स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री यांनी माता महाकालीची आरती केली.

Pankaja Munde
Pankaja Munde : वेगळा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्या विधानाचा अर्थ…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Devendra Fadnavis on Beed Politics
देवेंद्र फडणवीसांचे ‘नवीन बीड’चे आवाहन धनंजय मुंडेंसाठी आणखी एक धक्का आहे का?
Devendra Fadnavis Marathwada BJP maratha reservation suresh dhas
मराठवाड्यात देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा आता ‘नायक’ करण्यावर भर
Cm Devendra Fadnavis Statement About Suresh Dhas
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सुरेश धस आधुनिक भगीरथ एकदा मागे लागले की डोकं खाऊन….”
controversial referee decision at maharashtra kesari event
अन्वयार्थ : कुस्तीच चितपट होऊ नये यासाठी…!
Devendra Fadnavis Exclusive
Devendra Fadnavis : “कामाच्या नुसत्या घोषणा नाही, १०० दिवसांत रिपोर्ट कार्ड देणार”, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली योजना
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”

हेही वाचा : धक्कादायक! जात पंचायतीच्या आदेश झुगारला म्हणून सामाजिक बहिष्कार

फडणवीस म्हणाले, सामान्य माणसांचे जीवन सुखकर होईल असे काम करण्याचा आशीर्वाद माता महाकालीला मागितला आहे. महाराष्ट्र आणि सर्व समाज एकसंघ राहिला पाहिजे. समाजात काम करता असतांना शवेटचा माणूस डोळ्यासमोर राहिला पाहिजे. लाडक्या बहिणींचा आर्शिवाद आम्हाला मिळाला त्यातून ऊर्जा मिळत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले ५०० वर्ष जुने महाकालीचे मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकला जात असतांना त्यांनी माता महाकालीचे दर्शन घेतले असल्याचे ईतिहासात नमुद आहे. येथील परिसराराचा विकास करण्यासाठी २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हे काम आपण लवकर सुरु करण्याची मागणी केली. आमंत्रण स्वीकारून आपण आल्या बदलही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी आणि श्री महाकाली माता सेवा समीतीच्या सदस्या आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Story img Loader