चंद्रपूर : जूनी पेन्शन योजना लागू करावी ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. ह्या मागणीच्या संदर्भाने आम्ही पुर्णतः सकारात्मक असुन यासाठी माझा पाठींबा आहे. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून स्पष्ट भुमिका जाहीर केली आहे. आगामी काळात राज्यात आमची सत्ता येताच प्राधान्याने जुनी पेन्शन योजना लागू करणार, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

ब्रह्मपुरी येथे जुनी पेन्शन योजना कर्मचारी संघटनेच्या वतीने एल्गार मेळाव्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले, जुनी पेंशन संघटना राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, राज्य कार्याध्यक्ष आशुतोष चौधरी, राज्य सल्लागार सुनिल दूधे, राज्य महीला उपाध्यक्ष मनिषा मडावी, विभागीय अध्यक्ष अनिल वाकडे, विभागीय उपाध्यक्ष दुशांत निमकर, विपीन धाबेकर, गुरुदेव नवघडे, मनीष वैरागडे, राकेश शेंडे, गुलाब लाडे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
Guru Asta 2025 Guru will set for 27 days in the new year
Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra News : मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तातडीने दिल्ली दौऱ्यावर
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Surya Shani Yuti 2025
२०२५ ची सुरूवात ‘या’ तीन राशींसाठी नुकसानदायक; दोन मोठ्या ग्रहांच्या एकत्र येण्याने आर्थिक समस्या उद्भवणार
RBI
अग्रलेख: दोन पुढे, चार मागे!

हेही वाचा : नागपुरात दहा हजार नागरिकांनी घेतली बौद्ध धम्माची दीक्षा

यावेळी पुढे बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, विद्यमान शिंदे-भाजप सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. या सरकारने घेतलेले अनेक निर्णय हे चुकीचे होते. कंत्राटी नोकरभरतीचा शासन निर्णय काढून त्याचे कंत्राट ज्या ९ कंपन्यांना देण्यात आले होते, त्या कंपन्या सत्तेतील लोकांच्या होत्या. ह्या कंत्राटी नोकरभरतीला मी तीव्र विरोध केला आणि मुद्दा शेवटपर्यंत लावून धरला आणि तो निर्णय मागे घ्यायला सरकारला भाग पाडलं. मात्र आगामी निवडणुकांमध्ये विजय हा आमचाच असून सत्तेत येताच प्राधान्याने जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल. असे वचनही या प्रसंगी त्यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. स्निग्धा कांबळे यांनी केले. तर सुत्रसंचालन डांगे यांनी केले.

हेही वाचा : सरकारला बुद्धी द्यावी यासाठी बच्चू कडू अयोध्‍येत करणार प्रार्थना

महिला कर्मचाऱ्यांनी बांधल्या राख्या…

मेळाव्यात राज्य जुनी पेन्शन योजना कर्मचारी संघटनेच्या महिला पदाधिकारी यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना राख्या बांधून ओवाळणीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याची विनंती केली.

मी तुमच्या संघर्षात पुढे राहील…

जुनी पेन्शन योजना मिळविण्यासाठी आपण जे काही प्रयत्न कराल त्या संघर्षात मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहिल, असे अभिवचन यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थितांना दिले.

Story img Loader