चंद्रपूर :विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्ह्यातील सर्वच प्रमुख उमेदवारांचे कुटूंब प्रचारात रंगले आहे. शहरी व ग्रामीण भागात मतदार संघ असल्याने उमेदवाराला प्रत्येक ठिकाणी जाणे शक्य नाही. अशा वेळी पत्नी, मुलगी, मुलगा तसेच कुटूंबातील अन्य सदस्य मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बल्लारपुर मतदार संघात भाजपा उमेदवार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्नी सपना मुनगंटीवार, मुलगी शलाका बडवाई, जावई प्रचारात सहभागी झाले आहे. विसापुर गावात सपना मुनगंटीवार यांनी जाहीर सभा घेवून तेथील महिलांना मुनगंटीवार यांनी आजवर केलेल्या विकास कामांची माहिती दिली. कॉग्रेस उमेदवार संतोष रावत यांच्या पत्नीही प्रचारात सहभाग घेत आहेत. डॉ.अभिलाषा गावतुरे स्वत:च उमेदवार असल्याने त्यांचे पती डॉ. राकेश गावतुरे हे पत्नीचा प्रचार करित आहेत.

हेही वाचा…मायाच बायकोने कोणतं घोडं मारलं रे बुवा ‘ घराणेशाहीचे समर्थन आणि देवेंद्र फडणवीसांना सवाल.

ब्रम्हपुरी मतदार संघात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या पत्नी किरण वडेट्टीवार, मुलगी प्रदेश युवक कॉग्रेसची सचिव शिवानी वडेट्टीवार हिने प्रचाराची सूत्रे सांभाळली आहेत. चंद्रपूर मतदार संघात भाजपाचे किशाेर जोरगेवार यांच्या पत्नी कल्याणी जोरगेवार, दोन मुली कोमल व कामिनी, जावई तथा मुलगा प्रसाद प्रचारात सहभागी झाले आहे. तर कॉग्रेस उमेदवार प्रवीण पडवेकर यांच्या शिक्षक पत्नी रंजना पडवेकर, मुलगा तुषार पडवेकर खास अमेरीकेतून वडीलांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी चंद्रपूरात आला आहे. वरोरा येथे कॉग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांच्या प्रचाराची संपूर्ण धुरा त्यांची बहिण खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सांभाळली आहे.

हेही वाचा…”आम्ही मेंढर.. मेंढर..पाच वर्षाने होतो, आमचा लीलाव..’’, जावंधियांचे निवडणुकीवर भाष्य

तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल धानोरकर यांच्या प्रचाराची धुरा त्यांची आई वत्सला धानोरकर व पत्नी सांभाळत आहेत. भाजपाचे करण देवतळे यांच्या मातोश्री प्रचारात सक्रीय सहभाग आहेत. चिमूर मध्ये भाजपा उमेदवार किर्तीकुमार भांगडीया यांचे वडील माजी आमदार मितेश भांगडीया प्रचाराची सूत्रे सांभाळत सहभागी झाले आहेत. तर भांगडीया कुटूंबही प्रचारात काम करित आहे. राजुरा येथे कॉग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांचे अख्ये कुटूंबच प्रचारात आहे. त्यांच्या पत्नी, भाऊ माजी नगराध्यक्ष अरूण धोटे, बँकेचे संचालक भाऊ शेखर धोटे, मुलगा, पुतण्या युवक कॉग्रेस अध्यक्ष शंतने धोटे प्रचारात सक्रीय आहे. तर शेतकरी संघटनेचे ॲड.वामनराव चटप यांच्या पत्नीही प्रचारात आहेत. एकूणच बहुसंख्य उमेदवारांचे अख्खे कुटूंब प्रचार करतांना दिसत आहे

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chandrapur district assembly elections families of prominent candidates actively participated in campaigning rsj 74 sud 02