चंद्रपूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, सर्व स्तरातील, वयोगटातील मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदान करावे तसेच नवमतदार म्हणजेच युवा वर्गाचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग वाढावा, यादृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ‘तुमचे मत द्या आणि आकर्षक बक्षीसे जिंका’ ही स्पर्धाआयोजित करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे यात सहभाग घेऊन विजेत्या ठरणाऱ्या पहिल्या तीन मतदारांना अनुक्रमे मोटारसायकल, रेसिंग सायकल आणि मोबाईल मिळणार आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदान करून देशाच्या प्रगतीसाठी, ध्येयधोरणे ठरविण्यासाठी आपला सहभाग नोंदविणे अत्यंत महत्वाचे आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक १९ एप्रिल रोजी २११८ मतदान केंद्रावर होणार असून सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. १८ वर्षांवरील प्रथम मतदार मोठ्या संख्येने असल्याने व युवकांमध्ये मतदानाप्रती उत्साह निर्माण होण्यासाठी प्रशासनातर्फे स्वीप अंतर्गत अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे.

Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
vaibhav patil loksatta online quiz winner
वैभव पाटील ठरले लोकसत्ता ऑनलाईन निवडणूक मेगा क्विझचे विजेते; जिंकला स्मार्टफोन
Pune Rikshaw Driver Desi Jugaad
‘पुणे तिथे काय उणे…’ थंडीत रिक्षा चालवण्यासाठी रिक्षाचालकाचा जुगाड, VIRAL VIDEO पाहून पोट धरून हसाल
Loksatta pahili baju Markadwadi Live Mahavikas Aghadi EVM Scam Assembly Election Results
पहिली बाजू: ‘मारकडवाडी लाइव्ह’ नेमके कशासाठी?
Chota Warkari dancing in bhajan
‘नाद पाहिजे ओ…’ भरमंडपात हातात वीणा घेऊन त्याने ठेका धरला… छोट्या वारकऱ्याचा VIDEO पाहून म्हणाल “शेवटी संस्कार महत्त्वाचे”
Triumph Speed ​​T4
Triumph Speed T4: ट्रायम्फची शक्तीशाली बाईक एवढ्या रुपयांनी झाली स्वस्त, स्टॉक संपण्याआधी ऑफरचा घ्या लाभ
Arvind Kejriwal to contest from New Delhi AAP announces final list of 38 candidates
केजरीवाल नवी दिल्लीतून निवडणूक लढविणार; आपच्या ३८ उमेदवारांची अंतिम यादी जाहीर

हेही वाचा : Video: ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील आणखी एक वाघीण नागझिरा अभयारण्यात

१९ एप्रिल रोजी मतदान केल्यानंतर मतदारांनी शाई लावलेले बोट दाखवत मतदान केंद्रासमोर सेल्फी क्लिक करावा व आपला फोटो अपलोड करून ‘तुमचे मत द्या आणि आकर्षक बक्षीसे जिंका’ या स्पर्धेत सहभागी व्हावे. फोटो अपलोड करण्यासाठीची लिंक / क्यूआर कोड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://chanda.nic.in/en/divisions/collector-office-contact-details/ तसेच जिल्हा परिषदेच्या https://zpchandrapur.co.in/ वेबसाईटवर उपलब्ध आहे.

स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांकरीता प्रथम पारितोषिक १ लक्ष ६० हजार रुपयांची अपाची मोटारसायकल, द्वितीय पारितोषिक उच्च प्रतीची रेसींग सायकल आणि तृतीय पारितोषिक अँड्राईड मोबाईल फोन देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

Story img Loader