चंद्रपूर : गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर कधी मुसळधार तर कधी संततधार पाऊस सुरू आहे. रविवार शहरात संततधार पाऊस झाला. सततच्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. तसेच पाण्याचा प्रवाह वाढला आहे. अनेक छोट्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे मार्ग बंद झाले आहे. शहरातील महाकाली कालरी संकुलाला जोडणाऱ्या पुलावरून कार वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारी घडली. सुदैवाने कारमधील दोन जण थोडक्यात बचावले.

जिल्ह्यात २० जुलैपासून सतत पाऊस सुरू आहे. एकही दिवसांची उघडीप न देता पाऊस सुरू असल्याने नदी नाले तुडूंब भरून वाहत आहे. इरई धरणाचे दरवाजे सातत्याने उघडले जात असल्याने इरई व झरपट नदीला देखील पाणी आहे. तर अनेक छोटे मोठे नाले दुथडी भरून वाहत आहेत. रविवारी चंद्रपूर शहरात संततधार पावसाने हजेरी लावली. हा पाऊस सर्वदूर सूरू असतांना लालपेठ परिसरातील एका नाल्यातून कार वाहून गेली. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहरातून वाहणारी झारपाट नदी दुथडी भरून वाहत आहे. वेकोलि महाकाली कालरीला जोडणाऱ्या स्मशानभूमीजवळील झारपाट नदीच्या छोट्या पुलावरून पाणी वाहत आहे. एका कार चालकाने वाहत्या पाण्यातून पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे गाडी कल्व्हर्टवरून वाहू लागली. वाहनातून प्रवास करणाऱ्या दोघांनीही सावधपणे कर्बवरून उडी मारून आपला जीव वाचवला. मात्र कार पाण्याच्या प्रवाहात वाहत राहिली. घटनास्थळी उपस्थित लोकांकडून सांगण्यात येत आहे की, कारमध्ये दोन जण होते, त्यापैकी एकाने धोका पाहून खाली उतरले आणि दुसऱ्याने झाडाला लटकून आपला जीव वाचवला ही घटना समोर आली आहे ज्यामध्ये कार पाणी कसे वाहत आहे हे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान पावस सतत सुरू असल्याने ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी रस्ते बंद झालेले आहेत. नदी नाल्यांना पूर आलेला असल्याने अनेक पुल पाण्याखाली आलेले आहेत. अशा वेळी दुचाकी, चारचाकी वाहन चालकांनी पूलावरून पाणी वाहत असतांना रस्ता ओलांडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पोलिसांनी देखील एखाला रस्ता पूरामुळे बंद झाला असेल तर तिथे तातडीने बंदोबस्त तैनात करावा असे निर्देश देण्यात आले आहेत.

IShowSpeed performs daring backflip on Guatemalas Hand of God‘You have to stop risking your life for these reels
१७ सेकंदाच्या व्हिडीओसाठी युट्युबरने गमवला असता जीव! ‘हँड ऑफ गॉड’वर केली स्टंटबाजी, थरारक Video Viral
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sea Viral Video
‘आयुष्य आणि स्पर्धा..!’ भल्यामोठ्या लाटा, बोटीचा वेग, वादळ वारा; समुद्रातील ‘तो’ Video पाहून अंगावर येईल शहारा
a unique friendship between a city bus and an auto rickshaw
Video : नेहमी भांडणाऱ्या सिटी बस अन् रिक्षावाल्याचं प्रेम पाहिलं का? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “अशी मैत्री फक्त याच शहरात दिसू शकते..”
mahakumbh 2025 shocking video Chaos At Jhansi Railway Platform As Passengers Rushing To Board Maha Kumbh Special Train Fall On Track
Mahakumbh 2025: बापरे! महाकुंभला जाताना रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, कोण रुळावर पडलं तर कोण चेंगरलं; थरारक VIDEO समोर
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा
almost falls off cliff
उंच कड्यावर चढता चढता ती अचानक घसरली, खोल दरीत कोसळणार तेवढ्यात…. हृदयाचा थरकाप उडवणारा Video Viral
Local Train Shocking Video viral
लोकल ट्रेनच्या दरवाजावर उभे राहून प्रवास करणाऱ्यांनो ‘हा’ धक्कादायक VIDEO एकदा पाहाच; तुमच्याबरोबरही घडू शकेल अशी घटना

हेही वाचा : यवतमाळ : जुगार अड्डयावरील कारवाईला ‘नियमित तपासणी’चा मुलामा! ‘सोशल क्लब’वरील कारवाईबाबत प्रश्नचिन्ह

घोडाझरी तलाव ‘ओव्हरफ्लो’, पर्यटकांना ‘नो एन्ट्री’

पावसाळी पर्यटनासाठी आकर्षण असलेले घोडाझरी तलाव ‘ओव्हरफ्लो’ झाला आहे. त्यामुळे आज पर्यटकांसाठी तलावाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला. वनविभाग व पोलीस प्रशासनाकडून तशा सूचना देण्यात आल्या आहेत. घोडाझरी तलाव नागभीड तालुक्यात आहे. पावसाळ्यात पर्यटक या ठिकाणी मोठी गर्दी करतात.

हेही वाचा : मुसळधार पावसाने गडचिरोलीत हाहाकार, तीन राष्ट्रीय महामार्गांसह ४१ मार्ग बंद

अनोळखी इसमाचा मृतदेह मिळाला

पाऊस सुरू असतानाच चंद्रपूर शहरातील पठाणपुरा गेट बाहेरील माना टेकडीच्या खड्ड्यात एका ४५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह मिळाला आहे. मृताची ओळख पटविण्याचे काम पोलीस करीत आहे.

Story img Loader