चंद्रपूर : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी अंबुजा व एसीसी सिमेंट प्रकल्प खरेदी केल्यापासून सिमेंट कंपन्यांची दडपशाही वाढली आहे. व्यवस्थापनाच्या या दडपशाहीविरुद्ध लढा पुकारण्यासाठी अधिकारी व कामगारांना एकजूट राहणे गरजेचे आहे. सिमेंट कंपन्यांची दडपशाही खपवून घेणार नाही, याविरोधात भविष्यात मोठा लढा उभारणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार तथा कामगार नेते नरेश पुगलिया यांनी केले.

अंबुजा सिमेंट कामगार संघटनेच्या कार्यालयासमोर कामगार नेते तथा माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या नेतृत्वात शनिवारी जाहीर सभा झाली. यावेळी मंचावर सागर बल्की, वसंत मांढरे, तारासिंग कलशी, चंद्रशेखर पोडे, गजानन गावंडे, अशोक नागापुरे, देवेंद्र बेले, अविनाश जाधव, राधाबाई आत्राम, कामगार युनियनचे बल्की, उत्तम उपरे, बाळू गवारे, रामरतन पांडे उपस्थित होते.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवा! फडणवीस यांचे मराठा आंदोलकांना आवाहनच  जरांगे यांचे शिंदे यांना निमंत्रण

यावेळी पुगलिया म्हणाले, उपरवाही येथील अंबुजा सिमेट प्रकल्प व एसीसी सिमेंट अदानी समूहाच्या ताब्यात गेल्यानंतर कामगार व अधिकाऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. त्यांना जबरदस्तीने स्वेच्छानिवृत्ती घ्यायला भाग पाडले जात आहे. काही अधिकाऱ्यांना निरुपयोगी ठरवून त्यांना कामावरून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही दडपशाही रोकण्याकरिता अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना पत्र पाठवले. या पत्रातील मागण्यांची दखल अदानींनी घ्यावी. यापूर्वी अधिकाऱ्यांना अशी वागणूक व्यवस्थापनाने कधीच दिली नाही. अदानी समूह अशाच पद्धतीने काम करत राहिला तर औद्योगिक शांतता आणि सुसंवाद राखणे कठीण जाईल.

हेही वाचा : चंद्रपुर : वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू

सभेला एल. अँड टी. सिमेंट कामगार संघ, अल्ट्रटेक सिमेंट, एसीसी चांदा सिमेंट वर्क्स युनियन, मराठा सिमेंट वर्क्स, कामगार संघटना, अंबुजा सिमेंट, मुरली सिमेंट वर्क्स, कंत्राटी कामगार संघटना दालमिया, माणिकगड सिमेंट गडचांदुरचे पदाधिकारी व ऑफिसर असोसिएशनचे अधिकारी, महिला कामगार उपस्थित होते.

Story img Loader