चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत नुकत्याच झालेल्या पी.एच.डी. प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शोधप्रबंधाकरिता ‘सिनाॅप्सिस’ सादर करण्यासाठी मार्गदर्शक उपलब्ध होत नसल्याने त्यांची वणवण सुरू आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आचार्य पदवीपासून वंचित राहावे लागत आहे. गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत नुकतीच आचार्य पदवी प्रवेश परीक्षा (पेट) झाली. यामधे अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांचा आचार्य पदवीकरिता प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झाला. या प्रक्रियेत सुरुवातीला त्यांना त्यांच्या विषयाचा मार्गदर्शक (गाईड) ठरवून त्यानंतर प्रत्यक्ष शोधकार्यास सुरुवात करण्यापूर्वी संशोधन केंद्रात शोध प्रबंधाची ‘सिनाॅप्सिस’ सादर करावी लागते. त्यासाठी मार्गदर्शक असणे आवश्यक आहे. मात्र गोंडवाना विद्यापीठाच्या जाचक अटीमुळे विद्यापीठात विषयानुरूप पुरेसे मार्गदर्शक उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयाचे मार्गदर्शक मिळत नसल्याने आचार्य पदवी प्रवेश प्रक्रियेपासून त्यांना वंचित राहावे लागत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा