चंद्रपूर : राज्याचे वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या विभागातील खेळाडूंसाठी अतिशय उत्तम क्रिडा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मुनगंटीवार यांचे काम व्हिजन वीथ द मिशन प्रमाणे आहे. जात, धर्म पाहून मतदान करू नका तर विकास कामे बघून मतदान करा असे आवाहन भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी.टी.उषा यांनी केले. क्वीन ऑफ ट्रॅक ॲन्ड फिल्ड अशी ओळख असलेल्या राज्यसभा सदस्य व भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी.टी.उषा यांनी मंगळवारी सकाळी जिल्हा क्रिडांगण व बल्लारपूर तालुका क्रिडांगण येथे भेट देवून धावपटू व खेळाडूंसाठी तयार केलेल्या सिंथेटीक ट्रॅकची पाहणी केली. देशातील हा सर्वोत्तम ट्रक असल्याचे पी.टी.उषा म्हणाल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पूर्व विदर्भाचा कौल कुणाला? महायुती वर्चस्व राखणार, की आघाडीला ‘अच्छे दिन’ येणार?

मी धावपटू म्हणून तयार होत असतांना खेळाडूंना अशा पध्दतीच्या सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. मात्र राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दूरदृष्टी ठेवून २०३६ च्या ऑलिम्पिकची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. त्यांनी या भागातील खेळाडूंसाठी सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यामध्ये धावपटूंसाठी सिंथेटीक ट्रॅक, जलतरण तलाव, क्रिडांगण, बॅडमिंटन कोर्ट, व्हीॅलिबॉल, बास्केटबॉल तसेच इतरही खेळाडूंसाठी खेळाच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे खेळाडूंना उत्तम तयारी करून स्पर्धेत उतरता येवू शकते असेही उषा म्हणाल्या. बल्लारपूर मार्गावर अतिशय सुंदर अशी सैनिक शाळा बांधण्यात आलेली आहे. या शाळेत अतिशय उत्तम दर्जाच्या सोयीसुविधा विद्यार्थी व खेळाडूंसाठी असल्याची माहिती दिली. येथील क्रिडा सुविधा बघून मी अक्षरश: भारावले असून एका खेळाडूसोबत बॅडमिंटन खेळल्याचा अनुभव देखील उषा यांनी यावेळी कथन केला.

२०३६ च्या ऑलिम्पिकची तयारी जोरात सुरू झालेली आहे. आतापर्यंत या संदर्भातील दोन बैठका झालेल्या आहेत. तिसरी बैठक देखील लवकर होणार असल्याची माहिती दिली. निवडणूकीवर बोलतांना त्यांनी जात बघून नाही तर विकास बघून मतदान करा असे आवाहन केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chandrapur indian olympic association president pt usha for bjp leader sudhir mungantiwar lok sabha campaign rsj 74 css