चंद्रपूर : देशासोबतच महाराष्ट्रातील राजकारणात इतक्या विचित्र पद्धतीने बदल झाला आहे की कोण कोणत्या पक्षात आहे हेच कळायला मार्ग नाही. महाराष्ट्राच्या प्रत्येक आमदारांची मी गळा भेट घेताे, कारण कधी कोण मुख्यमंत्री होईल हे सांगता येत नाही, अशा आशयाची टिपणी करतांना प्रसिध्द हास्य कवी कुमार विश्वास यांनी कवितांमधून राजकीय परिस्थती, राजकीय पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून तर कॉग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस, भ्रष्टाचार, न्यायालय, पत्रकार व माध्यमांना कवितेतून लक्ष्य केले.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चांदा क्लब मैदाना आयोजितर तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी हास्य कवी संमेलनात एकाहून एक सरस कविता सादर केल्या. या संमेलनात कुमार विश्वास यांच्यासह मुंबईचे कवी दिनेश बावरा, मुमताज नसीम, रमेश मुस्कान व विनित चव्हाण सहभागी झाले होते. कविता सादर करतांना कुमार विश्वास यांनी राजकीय पक्षांवर टिपणी करतांनाच अनेकांवर कोपरखळ्या घेतल्या. नामिबिया येथून आलेले चिते भारतात येतांना त्यांना ईडी, सीबीआयची भिती वाटली नाही का, असा प्रश्न उपस्थित करित, चित्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याने दूर दूर पर्यंत भिती नाही, अशी टिपणी केली.

Rahul Gandhi - Vijay Wadettiwar
Rahul Gandhi : राहुल गांधी जागावाटपावरून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवर नाराज? वडेट्टीवार म्हणाले, “उमेदवार निवडीत गफलत…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Rahul Gandhi Upset With Maharashtra Congress Leaders?
Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांवर राहुल गांधी नाराज? नाना पटोले म्हणाले, “आम्ही…”
angry Bala Jagtap shouted He said Amar Kale promised him to make MLA after becoming an MP
‘ मला आमदार करायला निघाले होते, आता पत्नीसाठी अडून ‘ या इच्छुकाने डागली खासदारावर तोफ.
assembly election applications opening candidates rushed to submit their nominations on Monday
माहीम मध्ये कोणाविरुद्ध कोण? अनिश्चित्ता!
“…अन् सुनिधी चौहान मला म्हणाली, ‘माझ्या जवळ येऊ नकोस…'”, विजय वर्माने सांगितला ‘तो’ अनुभव
Ajay Chaudhary and Prakash Fatarpekar were not invited to the meeting at the Matoshree residence of Shiv Sena MLA
चौधरी, फातर्पेकर यांना डच्चू? ‘मातोश्री’वरील बैठकीला निमंत्रणच नाही
Sanjay Raut
Sanjay Raut : “महाराष्ट्रातले काँग्रेस नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत, भाजपाला हरवायचं असेल तर…”; संजय राऊत यांचं वक्तव्य

हेही वाचा :सायबर गुन्हेगार खेळतायेत जनधन योजनेचे ‘स्क्रॅच क्रार्ड’, ५ हजार रुपये खात्यात टाकण्याचे आमिष

राममंदिर उद्घाटन सोहळ्याचे कॉग्रेस तसेच अन्य पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण असतांना देखील सहभागी झाले नाही यावर देखील त्यांनी कवितेतून टिका केली. भाजप इव्हेंट ही इतना बडा करता है, की उसके सामने काम छोटा हो जाता है असे म्हणून देशात सर्वत्र सुरू असलेल्या इव्हेंटपूर्ण वातावरणावर टिका केली. यावेळी कुमार विश्वास यांनी देशातील राम मंदिर महोत्सवावर चलो अब लौट चले रघु राई, जन जन के हित इस निर्जन में हमने उमर खपाई, अवध में आ ही गये रघू राई ही कविता सादर केली. देशात एकही गुरूव्दारा किंवा जैन मंदिर इतर धर्मिय देवस्थान तोडून बांधण्यात आले नाही असे सांगतानाच मस्जिदे हमने बनाई मंदिरोंको तोडकर, मस्जिदे क्या बन नही सकती थी मंदिर छोडकर हा शेर ऐकविताच हजारो श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. या शेरवर मुस्लीम धर्मीयांच्या टाळ्या याच आपल्यासाठी पद्मश्री आहे, असेही विश्वास म्हणाले.

हेही वाचा : तीन मद्यधुंद तरुणींचा भर चौकात राडा, व्हायरल व्हिडिओची समाजमाध्यमांवर चर्चा

या देशात ३० वर्ष राम मंदिराचा खटला न्यायालयात सुरू होता यावर विश्वास यांनी टिपणी करतांना त्याच न्यायालयाला रामनवमीची सुटी असते असेही सांगितले. यावेळी विनित चव्हाण यांनी काश्मीर को पत्थरबाजी का बाजार बना डाला ही वीररसाची कविता सादर केली. तर मुमताज नसीम यांनी गझल सादर केल्या. दिनेश बावरा यांनी मोबाईलवर कविता सादर केली तर रमेश मुस्मान यांनी देशातील राजकीय परिस्थितीवर कविता सादर केली. यावेळी कुमार विश्वास यांना स्मतीचिन्ह व भेटवस्तू देवून मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच आमदार किशोर जोरगेवार यांचा सत्कार ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केला. आमदार जोरगेवार यांनी चंद्रपूरच्या नागरिकांना ताडोबा प्रवेशशुल्कात सुट मिळावी अशी मागणी वनमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे केली.

हेही वाचा : पीडितासह पिता, काका झाले फितूर; तरीही आरोपीला शिक्षा, जाणून घ्या काय आहे प्रकरण…

यावेळी विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा वनबलप्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक विरेंद्र तिवारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) शोमिता विश्वास, महिम गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, ताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आदि मान्यवरांची उपस्थिती होती .