चंद्रपूर : ईव्हीएम विरोधात चंद्रपुरातील वकील आज रस्त्यावर उतरले होते. वकिलांच्या मुकमोर्चात ईव्हीएम बंद करा अशी मागणी करण्यात आली. संविधानाने मतदारांना दिलेल्या बहुमूल्य मताचा योग्य वापर व्हावा तसेच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका निष्पक्षपणे व पारदर्शकरित्या पार पडाव्या यासाठी ईव्हीएम मशीन बंद करण्यात यावी व सर्व निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरने घेण्यात यावी म्हणून ॲड. दत्ता हजारे, ॲड. भिमराव रामटेके, .ॲड. वाकडे, ॲड. झेड के खान, ॲड. पि.एम. आवारी, ॲड. शरद आंबटकर, ॲड. जयंत साळवे, ॲड.वैशाली टोंगे, ॲड. फरहान बेग, ॲड. शंकरराव सागोरे यांच्या मार्गदर्शनात मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
सदरचा मोर्चा न्यायालय प्रवेशद्वारापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. जिल्हाधिकारी यांचे मार्फत महामहिम राष्ट्रपती तसेच केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांना निवेदन देण्यात आले. सदरच्या मोर्चात बहूसंख्य वकिलांनी भाग घेतलेला होता.