चंद्रपूर : अझात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाला आहे. ही घटना कान्पागावाजवळ रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. मृत बिबट्या मादी असून दोन वर्षांचा आहे.
या घटनेची माहिती वनविभाग, पोलिसांना देण्यात आली. नागभीड तालुक्यातील कान्पा हे गाव जंगलालगतच आहे. सायंकाळच्या सुमारास एक बिबट्या रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने त्याला धडक दिली. यात बिबट्या ठार झाला आहे.
हेही वाचा : …म्हणून शिंदे स्वप्नातही मुख्यमंत्री पदाची खुर्ची पकडून ठेवतात; वडेट्टीवार यांचा टोला
या घटनेनंतर वाहनचालकाने तेथून पळ काढला. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती वनविभाग, पोलिसांना दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी एस. बी. हजारे, बी. एस. कुथे घटनास्थळी दाखल झाले. मृत बिबट्या मादी असून त्याचे वय दोन वर्षे आहे.