चंद्रपूर: चंद्रपूर-वणी-आर्णी मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी वडीलांचा हात पकडून मुंबई ते दिल्ली वाऱ्या करणारी राज्याचे विरोधी पक्ष नेेते विजय वडेट्टीवार यांची कन्या तथा प्रदेश युवक काँग्रेसची सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार कॉग्रेसच्या किंबहूना आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारापासून दूर आहेत. एकीकडे लोकसभेची उमेदवारी मागायची आणि तिकीट मिळाली नाही तर पक्षाच्या प्रचारापासून दूर राहायचे ही कुठली निष्ठा अशी टिका आता शिवानी वडेट्टीवार यांच्यावर होत आहे.

प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात वडीलांचा हात पकडून सक्रीय असलेल्या शिवानी वडेट्टीवार यांनी चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी चांगलीच धावपळ केली. विजयक्रांती कामगार संघटनेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योग वर्तुळात काम सुरू करणाऱ्या शिवानी वडेट्टीवार यांनी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी लोकसभा क्षेत्रातील कॉग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. मी लोकसभेची उमेदवारी मागणार आहे, तेव्हा सहकार्य करा म्हणून शिवानीने अनेकांच्या घरी भेट दिली. युवक कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांना सोबत घेवून एक दोन छोटी मोठी आंदोलने, ओबीसी मोर्चा तथा बेरोजगारांच्या मोर्चाला हजेरी लावली. त्यानंतर थेट मुंबई व दिल्लीत कॉग्रेस श्रेष्ठींकडे लोकसभेची उमेदवारी मागण्यासाठीच गेली.

India Meteorological Department issues yellow alert for rain in Vidarbha and Marathwada
आज दूपारनंतर पावसाला सुरुवात, विदर्भ आणि मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
thane farmhouses party loksatta news
सुट्टी नसल्यामुळे जवळच्या ठिकाणी नववर्षाचे स्वागत करण्यास तरुणांची पसंती; कर्जत, लोणावळा, माथेरान मधील शेतघरांमध्ये आगाऊ नोंदणी
experienced cold temperatures for past few days cold will remain in Mumbai till end of month
मुंबईत महिनाअखेरीपर्यंत गारठा कायम राहणार
News About Mahayuti
Mahayuti : महायुतीला प्रचंड बहुमत मिळूनही गोंधळाची स्थिती का आहे? काय आहेत कारणं?
Image of Rahul Gandhi and Arvind Kejriwal
Markadwadi : उद्धव ठाकरे, राहुल गांधी, केजरीवाल मारकडवाडीला देणार भेट, शरद पवार यांच्या आमदाराने सांगितली तारीख
Today is the shortest day and longest night of the year
आज वर्षातील सर्वात लहान दिवस व सर्वात मोठी रात्र, जाणून घ्या नेमकं असं का?

हेही वाचा… खामगाव ‘एमआयडीसी’तील ‘अथर्व ॲग्रोटेक’ला भीषण आग, लाखोंची हानी

शिवानीला उमेदवारी मिळावी यासाठी विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार यांनी चांगलेच वजन खर्ची केले. खासदार राहुल गांधी पासून तर कॉग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जून खरगे, कॉग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, खासदार मुकूल वासनिक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापासून दिल्लीत सर्वांच्या घरी भेटी देवून मुलीला उमेदवारी द्या असा आग्रह धरला. मात्र पक्षाने एक तर तुम्ही लढा किंवा आमदार प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवा अशी भूमिका घेतली. मुलीला उमेदवारी देण्यास पक्षाने असमर्थता दर्शविल्यानंतर शेवटी वडेट्टीवारांनी पक्षाकडे आग्रह करणे सोडून दिले. दरम्यान वडेट्टीवारांनी स्वत: लोकसभा लढण्यास नकार दिल्यानंतर आमदार धानोरकर यांना उमेदवारी मिळाली हे सर्वश्रूत आहे. यानंतर शिवानी वडेट्टीवार हिने किमान चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात येवून कॉग्रेसचा प्रचार करणे अपेक्षित होते. मात्र चंद्रपूर मधून उमेदवारी मिळाली नाही म्हणून शिवानी त्यानंतर चंद्रपूरला भटकलीच नाही.

हेही वाचा… वर्धा : जंगलात पाणीटंचाई, प्राण्यांसाठी १५ बोअरवेलचे काम सुरू

सध्याही शिवानी वडेट्टीवार कॉग्रेसच्या प्रचारापासून दोन हात दूर आहे. चंद्रपूरातून लोकसभेची उमेदवारी मागितली तेव्हा उमेदवारी मिळाली नाही तर किमान पक्षाचा प्रचार करण्याची तरी तयारी दाखवायला हवी होती. त्यामुळे पक्षाने भविष्यात तरी उमेदवारी देण्याचा विचार केला असता. मात्र येथे पक्षाने उमेदवारी देण्यास नकार देताच शिवानी वडेट्टीवार अचानक बेपत्ता झाली. त्यामुळे शिवानी वडेट्टीवार स्वत:साठी काम करतात कि पक्षासाठी हा प्रश्न देखील येथे उपस्थित झाला आहे. स्वत:ला प्रचारापासून दूर ठेवायचे ही कुठली निष्ठा असेही येथे कॉग्रेसच्या वर्तुळातून विचारले जात आहे. तिकडे वडेट्टीवार यांच्या भूमिकेमुळे त्यांचे समर्थकही व्दिधा मनस्थितीत आहेत. आज लोकसभेचा प्रचार सुरू होऊन सात दिवसाचा कालावधी झाला आहे. मात्र या सात दिवसात शिवानी वडेट्टीवार चंद्रपुरात दिसल्या नाहीत अशीही चर्चा आहे.

Story img Loader