चंद्रपूर: अखिल भारतीय काँग्रेस समितीने अखेर काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी आमदार सुभाष धोटे यांची नियुक्ती केली आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी वेणुगोपाल यांनी गुरुवारी पत्र जारी करून या नियुक्तीची माहिती दिली आहे. माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार गटाला हा हादरा आहे.

हेही वाचा… कैद्यांच्या मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले; कारागृह प्रशासन आणि वजह फाऊंडेशनचा पुढाकार

विशेष म्हणजे, गेल्या महिनाभरापासून पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाबाबत संभ्रमाचे वातावरण असून, गेल्या काही दिवसांत झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप झाले. भाजपसोबत युती, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना तडकाफडकी निलंबित करून आमदार सुभाष धोटे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती.

हेही वाचा… हजारो तलाठ्यांची नोकरी धोक्यात! २०१९ च्या तलाठी भरती घोटाळ्याला नवे वळण

मात्र नंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने या नियुक्तीला स्थगिती देत ​​पदावर कायम ठेवण्याच्या सूचना दिल्या. तेव्हापासून या पत्राचा हवाला देत माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे या पदावर आपला दावा करत होते, त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. आता एआयसीसीच्या या नियुक्ती पत्राने जिल्ह्यातील काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाबाबतचा संभ्रम दूर झाला आहे.

Story img Loader