चंद्रपूर : जुलै २०२२ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये चंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल ४८ हजार ६१५ थकबाकीदारांची बत्ती गुल झाली आहे. यात ३४ हजार ८६६ तात्पुरत्या स्वरुपात तर १३ हजार ७४९ थकबाकीदार ग्राहकांचा कायमस्वरुपी वीजपुरवठा थकबाकीसाठी खंडीत करण्यात आला. जुलै व ऑगस्ट २०२३ या दोनच महिन्यात ३ हजार १०३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. वीजेशिवाय राहता न आल्यामुळे १७ हजार ५८८ ग्राहकांनी पूनर्जोडणी शुल्क भरणा करुन वीजपुरवठा लगेच सुरळीत करुन घेतला. चंद्रपूर जिल्ह्यातील २९ हजार ३७१ तर गडचिरोली जिल्ह्यातील १९ हजार २४४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेची थकबाकी ४८८ कोटी २६ लाखाच्या घरात पोहेाचल्याने थकबाकीदारांविरोधात वसुली व वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहिम राबविण्यात येत असून महावितरणची आर्थिक स्थिती समजून घेवून ग्राहकांनी थकबाकी भरून महावितरण या आपल्याच कंपनीला सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी केले आहे.

हेही वाचा : नागपुरातही मराठा आरक्षण आंदोलन पेटले, गणेशपेठमध्ये टायर पेटवले

चंद्रपूर परिमंडळात चालू वर्षातील व मागील वर्षाच्या एकंदरीत मागणीपैकी घरगुती ग्राहकांकडुन २० कोटी २१ लाख येणे आहे. तर वाणिज्यिक गाहकांकडुन ५ कोटी ३० लाख येणे आहे,औद्योगिक ग्राहकांकडुन ३ कोटी २८ लाख थकबाकी वसुली येणे आहे. ग्रामीण व शहरी पाणी पुरवठा योजनांकडून ३ कोटी ३३ लाख येणे आहे. चंद्रपूर जिल्ह्यात घरगुती ग्राहकांकडुन १४ कोटी ५६ लाख येणे आहे. तर वाणिज्यिक गाहकांकडुन ४ कोटी ४९ लाख औद्योगिक ग्राहकांकडुन २ कोटी २५ लाख थकबाकी वसुली येणे आहे.

हेही वाचा : १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट आयटी कंपनीत नोकरी, वाचा काय आहे प्रकरण

ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडून २ कोटी ९६ लाख येणे आहे. गडचिरोली जिल्ह्यात घरगुती ग्राहकांकडुन ५ कोटी ६५ लाख येणे आहे. तर वाणिज्यिक गाहकांकडुन ८१ लाख तर औद्योगिक ग्राहकांकडुन १ कोटी ३ लाख थकबाकी वसुली येणे आहे. ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडून ३८ लाख येणे आहेत.