चंद्रपूर : वीज केंद्राच्या वसाहतीच्या एका नाल्यावरील पुलावर दोन वाघ रस्ता पार करताना दिसल्याने खळबळ उडाली आहे. वीज केंद्र परिसरात पुन्हा वाघाचे दर्शन झाल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वीज केंद्र परिसरातील एक कुटुंब मित्राच्या मुलीचा संगीत/हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी परत जाताना वसाहती जवळील नाल्याच्या पुलावर रात्री १२.३० वाजता दोन मोठे वाघ रस्ता ओलांडताना बघितले. वाघ रस्ता पार करीत असतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर सार्वत्रिक होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : थंडीमुळे चंद्रपूर गारठले, सर्वत्र हुडहुडी

वीज केंद्र वसाहत परिसरात वाघ आहे. वीज केंद्र वसाहत परिसराला ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलाचा भाग लागून आहे. तेथूनच वाघ वीज केंद्र परीसरात येतात. वीज केंद्र परिसरात मोठं झुडपी जंगल आहे. तसेच एक नाला देखील तेथून वाहतो. त्यामुळेच या परिसरात वाघ सातत्याने दिसत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chandrapur people saw two tigers crossing road in urjanagar area rsj 74 css