चंद्रपूर : शहरातील पठाणपुरा मार्गावर दोन पोलिसांवर हल्ला करण्यात आला. यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. दिलीप चव्हाण (३६) असे मृताचे तर संदीप ऊर्फ समीर चाफले (३४) असे जखमीचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी अक्षय ऊर्फ आकाश संजू शिर्के , यश अनिल समुंद व नितेश हनुमान जाधव (२९) या तीन आरोपींना अटक केली आहे. तिघांचीही तीन दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई समीर चाफले व दिलीप चव्हाण एका बारमध्ये मद्या प्राशन करीत होते. नितेश जाधव आणि अक्षय शिर्केही तिथेच होते. यावेळी बिल देण्यावरून जाधव व शिर्के यांचा बार व्यवस्थापकाशी वाद झाला. हा वाद हाणामारीवर जाण्यापूर्वी चाफले याने मध्यस्थी केली. मात्र आरोपींनी चाफलेशी वाद घातला. त्यानंतर चाफले व चव्हाण घरी जात असताना आरोपींनी मार्गातच चाकूने वार केले.

पोलिसांच्या आशीर्वादामुळे गुन्हेगार निर्ढावले

जिल्ह्यात पोलिसांच्या आशीर्वादाने कोळसा, वाळू, दारू, तंबाखू, गुटखाची तस्करी वाढली आहे. परिणामी, गुन्हेगारीत वाढ झाली आहे.

भरवस्तीत मद्यालय

उत्पादन शुल्क विभागाने भरवस्तीत मद्यालयाला परवानगी कशी दिली, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानंतर देखील मद्यालयाला मंजुरी मिळाली आहे. या भरवस्तीत मद्यालयाचा परवाना रद्द करावा, अशी मागणी प्रभागातील नागरिकांनी केली आहे.