चंद्रपूर : जिल्ह्यात सुगंधी तंबाखू व गुटखा तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बल्लारपूर येथील “जयसुख” या तंबाखू तस्कराने जिल्हाभर जाळे विणले आहे. अशातच रामनगर पोलिसांनी जयसुख याची ७ लाखांची सुगंधी तंबाखू मारुती कारमध्ये पकडल्याने खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : अनेक रेल्वे गाड्या रद्द, प्रवाशांना मनस्ताप; सणासुदीच्या काळात बाहेरगावी जाणाऱ्यांचे हाल

बल्लारपूर पोलिसांकडून जयसुख याला अभय मिळत असले तरी पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी जयसुख या तस्कराच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. जयसुख याची सुगंधी तंबाखू एका चार चाकी वाहनातून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी चंद्रपूर – बल्लारपूर बायपास मार्गावर एका मारुती कारमधून हा सुगंधी तंबाखू गुटखा जप्त केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chandrapur police seized banned tobacco of rupees 7 lakhs of tobacco smuggler jaysukh rsj 74 css