चंद्रपूर : राजुरा विधानसभा मतदार संघाचे तीन माजी आमदार मंचावर आहेत.या तिघांपैकी एकाला ऑक्टोंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विजयी करून “आजी आमदार” करायचे आहे असे प्रतिपादन करित शेतकरी संघटनेचे नेते ॲड.वामनराव चटप यांना निवडून आणण्याचा सूचक इशारा धनोजे कुणबी समाज मंदिराचे अध्यक्ष ॲड.पुरूषोत्तम सातपुते यांनी केला.

धनोजे कुणबी समाजाच्या अध्यक्षांनीच असे वक्तव्य केल्याने कुणबी समाजाचे राजुरा विधानसभेचे विद्यमान आमदार सुभाष धोटे यांचा पराभव या सर्वांना करायचा आहे का असा प्रश्न यानिमित्ताने पडला आहे. धनोजे कुणबी समाज मंदिराच्या वतीने रविवार ९ जून रोजी गुणवंतांचा सत्कार सोहळा पार पडला. धनोजे कुणबी समाज मंदिराच्या सभागृहात आयोजित या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष ॲड.पुरूषोत्तम सातपुते होते.

rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
Vidhan Bhavan premises Central Vista vidhan
विधानभवन परिसराचा कायापालट, अध्यक्षपदी फेरनिवड होताच राहुल नार्वेकर यांचा पुनरुच्चार; सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर विकास
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!

हेही वाचा…शुभमंगल सावधान! सर्वधर्मीय १०८ जोडप्यांचा शाही सामूहिक विवाह सोहळा, ३० वर्षांत २२०० वधु-वरांचे शुभविवाह

कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. तर विशेष अतिथी आमदार सुधाकर अडबाले, प्राचार्य अशोक जीवतोडे होते. प्रमुख अतिथी म्हणून राजुरा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार ॲड.वामनराव चटप, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार ॲड.संजय होते होते. लोकसभा निवडणुकीत कुणबी समाजातून येणाऱ्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या विक्रमी विजयाने कुणबी समाजातील प्रत्येकाचा आत्मविश्वास बळावला आहे.

याच आत्मविश्वासाच्या बळावर कुणबी समाजाचे अध्यक्ष ॲड.पुरूषोत्तम सातपुते यांनी राजुरा विधानसभा मतदार संघाचे तीन माजी आमदार कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या तीन पैकी एकाला ऑक्टोंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आजी आमदार करायचे आहे असे आवाहन केले. ॲड.सातपुते काँग्रेस विचारसरणीचे आहेत.

हेही वाचा…गडचिरोलीत तब्बल २ हजार कोटींच्या भूखंडांना अवैध परवानगी ? अर्चना पुट्टेवारच्या अटकेंनंतर भूमाफिया अडचणीत

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी जाहीर केलेल्या जिल्हा काँग्रेस समितीच्या सल्लागार मंडळात ॲड. सातपुते होते. मात्र जिल्हा काँग्रेसची कार्यकारिणी काँग्रेस झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच ॲड.सातपुते यांनी आमदार धोटे यांनी विश्वासात न घेताच सल्लागार पदी नियुक्त केले असे सांगून पदाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्या मागील नेमके कारण काय होते हे कळले नाही. मात्र आता ॲड.सातपुते यांनी कार्यक्रमाला उपस्थित तीन माजी आमदारांपैकी एकाला आजी आमदार करा असे आवाहन केले आहे. ॲड.सातपुते यांनी या आवाहनातून एक प्रकारे विद्यमान आमदार धोटे यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करून घरी बसवा असाच सल्ला दिला आहे. ॲड.सातपुते व ॲड. चटप यांची घनिष्टता आहे.

हेही वाचा…राजकारण सहमतीचे असावे; सरसंघचालक मोहन भागवत यांचे सत्ताधारी, विरोधकांना आवाहन

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला उपस्थित माजी आमदार ॲड.संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर भाजपात सक्रीय आहेत. तर ॲड.चटप शेतकरी संघटनेत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत धनोजे कुणबी समाजाने विद्यमान आमदार सुभाष धोटे, माजी आमदार संजय धोटे, सुदर्शन निमकर यांना मदत न करता ॲड.चटप यांनाच मदत करावे असा संदेश दिला आहे. विशेष म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार सुभाष धोटे यांनी ही आपली शेवटची निवडणूक आहे असे म्हणत मतदान मागितले होते.

Story img Loader