Raj Thackeray in Chandrapur: आजचे राजकारण इतके खालच्या स्तराला गेले आहे की, आमदार, खासदार, नेते विकल्या जात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमदार विकला गेला तर त्याला भर रस्त्यात नागडा करून फटके मारणार, या शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खडे बोल सुनावले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवनिर्माण यात्रेच्या निमित्ताने राज ठाकरे २२ ऑगस्ट रोजी चंद्रपुरात आले होते. यावेळी स्थानिक एन.डी. हॉटेल येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत बोलताना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम देताना मनसे आमदार विकला गेला तर भर रस्त्यात नागडा करून फटके मारणार, असे सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यात निवडणुका लढविल्या पाहिजे की नाही ? सर्व मिळून लढणार का? चंद्रपूर ही आपली ताकद आहे. संघटनात्मक बांधणी झाली आहे की नाही हे बघणे आवश्यक आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे आहे. मराठवाड्याचा दौरा पूर्ण झाला आहे. विदर्भाचा दौरा सुरू आहे.असे ठाकरे म्हणाले.

What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
Candidates say Raj Thackeray cheated citizens of Vaidarbh
उमेदवार म्हणतात राज ठाकरेंकडून वैदर्भियांची फसवणूक
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
Uddhav Thackeray Raj Thackeray
“राज ठाकरे भाषण करून गेले तिथे अडरवर्ल्डच्या मदतीने…”, ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप; म्हणाले, “अनेक मतदारसंघांत गुंडांच्या टोळ्यांना…”
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, “बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली तर..”
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “रतन टाटांसारखा सभ्य व्यावसायिक सगळ्यांना आवडतो मग राजकारणी डँबिस…”

हेही वाचा : Akola Sexual Assault: धक्कादायक! १० वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, ठार मारण्याची धमकी देऊन…

आजची महाराष्ट्राची परिस्थिती फार वाईट आहे. तेव्हा कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी इमाने इतबारे प्रामाणिकपणे, तळागाळापर्यंत व्यवस्थित काम केले तर माझा आतला आवाज सांगतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यात पक्ष म्हणून सत्तेत असेल. राज्यातील लोक त्रस्त, हैराण आहेत. महाराष्ट्राचे राजकारणात कोण कोणत्या पक्षात आहे हे कळायला मार्ग नाही, आमदार, नेते विकले जात आहेत. उन्हात तासनतास उभे राहून मतदार मतदान करणार, आणि ही लोक विकली जाणार. लोकांना ही गद्दारी आवडली नाही, राज्यात लोकसभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या विरोधात मतदान झाले याचा अर्थ ते शरद पवार किवा उध्दव ठाकरे यांच्या बाजूने झाले असा होत नाही, संविधान बदलणार हे भाजप खासदार यांनी सांगितले. त्यामुळे दलीत मतदार भाजप विरोधात गेले. मुस्लिम मतदार देखील भाजपच्या विरोधात आहे. मनसेने माती झालेली नाही. मनसेचा आमदार विकल्या गेला तर भर रस्त्यात नागडा करून फटके मारणार, असे ठाकरे म्हणाले.

हेही वाचा : कारण राजकारण : नाना पटोलेंना मतदारसंघातच रोखण्याचे भाजपपुढे आव्हान

पक्षातील कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायची आहे. चांगल्या लोकांना पक्षात घ्या, चांगले असेल तर घेऊ, पक्षात कोणी पाठवला असेल तर घेणार नाही. विदर्भात प्रचाराला येणार आहे. पोलिसांवर दबाव असतात म्हणून त्यांना हालचाल करता येत नाही, चूक मंत्री, सरकरची असते आणि भूमिका घेणाऱ्या पोलिसांना निलंबित केले जाते. रजा अकादमीच्या विरोधात मुंबईत आम्ही मोर्चा काढला व मुंबई पोलीस कमिशनरला राजीनामा द्यावा लागला होता. कुठेही अत्याचार झाला तर सर्वप्रथम प्रशासन आडवे येते. माझ्या हातात सत्ता आली तर ४८ तासात सरळ करणार. जगात अशक्य काहीच नाही, माझा विचार महाराष्ट्राला उत्तम प्रशासन देण्याचा आहे. उमेदवार म्हणून चांगले लोक हेरन्याचा प्रयत्न आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील चार उमेदवार लवकरच जाहीर करणार आहे असेही सांगितले.