चंद्रपूर : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाद्वारे दररोज २४ तास होत असलेल्या हवा गुणवत्ता निरीक्षणाची २०२४ या वर्षातील आकडेवारी पाहता चंद्रपुरात ३६६ दिवसांपैकी केवळ ७३ दिवस प्रदूषणमुक्तीचे (Good) ठरले ,१४० दिवस सामाधानकारक (Satisfactory) प्रदूषण, १३७ दिवस माफक (Moderate) प्रदूषणाचे तर १६ दिवस (Poor) आरोग्यासाठी धोकादायक होते. हानिकारक (very poor & severe) प्रदूषण एकही दिवस नव्हते.
२०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये चंद्रपुरातील प्रदूषण थोडे कमी झाले, ही समाधानाची बाब असली तरी सूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण आणि जमिनीवरील ओझोनचे प्रमाण वाढले असून हे आरोग्यासाठी धोक्याचे आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निरीक्षनाच्या आधारे ही वार्षिक आकडेवारी येथील पर्यावरण अभ्यासक आणि ग्रीन प्लानेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे यांनी येथे प्रसिद्धीला दिली आहे.
हे ही वाचा… डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खरच आरएसएसच्या शाखेला भेट दिली होती का?
२०२३ वर्षातील ३६५ दिवसात ३३३ प्रदूषित आणि केवळ ३२ दिवस आरोग्यदायी श्रेणीत (Good AQI ) होते. ( १४१ दिवस हे समाधानकारक प्रदूषणाचे श्रेणीत ( Satisfactory AQI ) ,१५१ दिवस हे माफक प्रदूषणाचे (Moderate) श्रेणीत , ३६ दिवस अतिशय प्रदूषित श्रेणीत ( Poor) , तर ०५ दिवस हाणीकारक प्रदूषणाचे श्रेणीत होते. २०२४ ह्या मागील वर्षात एकूण ३६६ दिवसात २९३ दिवस प्रदूषित होते.त्यात ७३ दिवस प्रदूषण मुक्तीचे, १४० दिवस समाधानकारक प्रदूषण,१३७ दिवस साधारण प्रदूषण तर १६ दिवस धोकादायक प्रदूषण होते. शहरात धोकादायक आणि हाणीकारक श्रेणीतील प्रदूषण नोंदवले गेले नाही, ही समाधानाची बाब आहे. तसेही कमी झालेले प्रदूषण हे उपाययोजनांपेक्षा अकाळी पाऊस, हवामान बदलामुळे आहे.
चंद्रपूर जिल्ह्यासोबतच शहरात आणि औद्योगिक क्षेत्र खुटाळा येथे सतत वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्राद्वारे (CAAQMS) वायू प्रदूषणाची नोंद घेतल्या जाते. तिथे शहरापेक्षा जास्त प्रदूषण आढळते. प्रस्तुत आकडेवारी शहरातील बस स्थानक जवळ असलेल्या केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या केंद्रातील आहे. ही जरी शासकीय यंत्रणेद्वारे घेतलेली नोंद असली तरी घुग्गुस ओउद्योगिक क्षेत्रात यापेक्षाही जास्त प्रदूषण पाहायला मिळते. वर्षातील ३६६ दिवसात सर्वाधिक सूक्ष्म धुलीकण २.५ चे प्रमाण जास्त म्हणजे १६० दिवस आढळले. १० मायक्रोमीटरची प्रदूषके १४४ दिवस आढळले, ५४ दिवस पावसाळ्यात जमिनीवरील ओझोन चे धोकादायक प्रदूषण आढळले. दोन दिवस कार्बन मोनोक्साइड चे प्रदूषण आढळले.
वायू प्रदूषण निर्देशांक (AQI) कसा काढतात?
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे देशातील प्रदूषित क्षेत्रात सतत हवा गुणवत्ता मापन (CAAQMS) केले जाते. चंद्रपूरमध्ये बस स्थानक आणि खुटाळा येथे ही सुविधा उपलब्ध आहे. ह्यात सूक्ष्म धुलीकण, नायट्रोजन डायॉक्साइड, सल्फर डाय ऑक्साईड, कार्बन डाय ऑक्साईड आणि ओझोन किंवा कमीतकमी मुख्य तीन प्रदूषके ह्याद्वारे AQI निर्देशांक तयार केला जातो. प्रत्येक प्रदुशकांची स्वतंत्र नोंद वेगळी असते, परंतु AQI साठी सर्व प्रदूषके मिळून सरासरी काढल्या जाते.
हे ही वाचा… संमेलनाच्या प्रवेशद्वारास सावरकरांचे नाव! साहित्यप्रेमींच्या मागणीची महामंडळाकडून दखल
प्रदूषणाचे स्त्रोत आणि आरोग्यावर परिणाम
चंद्रपूर शहरात मागील ४ महिने चंद्रपूर वीज केंद्राचे अधिक प्रदूषण होते. वाहतूक आणि वाहनांचे प्रदूषणसुद्धा आहे. वाहनांचा धूर आणि धूळ, वाहतूक, कचरा ज्वलन ,लाकूड, कोळसा ज्वलन इ औद्योगिक क्षेत्रात कोळसा ज्वलन राख,दूषित वायू ,वाहतूक, जल ,थल,ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे चंद्रपुरकर गेल्या १० वर्षापासून त्रस्त आहेत. २००५/०६ साली चंद्रपूर चा आरोग्य सर्वे झाला होता त्यात आरोग्याच्या समस्येची भयावहता दिसली ,वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे विविध रोग, दमा ,टीबी, केंसर ,सर्दी, खोकला, डोळे ,त्वचा, आणि हृदय रोगांचे रुग्ण वाढत आहेत. आरोग्यासाठी येणारा खर्चसुद्धा मोठा आहे .तेव्हा स्थानिक महापालिका,जिल्हापरिषद सदस्य आणि आमदार,खासदार असलेल्या लोकप्रतिनिधीनि प्रदूषण आणि आरोग्य हा विषय शासनाकाडे लावून धरला पाहिजे. नागरिक आणि मतदारांची काळजी घेणे हे सरकारचे घटनात्मक कर्तव्य आहे.