चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील पालगाव येथील श्वेता बाबाभीम उमरे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग ग्रुप क २०२२ मुख्य परीक्षा देऊन घवघवीत यश संपादन करून परीक्षा उत्तीर्ण केली. विशेष म्हणजे ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालगावची विद्यार्थिनी आहे. अभियंता ते अधिकारी असा प्रवास तिने पूर्ण केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालगाव येथील श्वेता ही निवृत्त शिक्षक बाबाभीम उमरे यांची मुलगी आई गृहिणी. श्वेताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक ते चार वर्गापर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर तिने जवाहरलाल नेहरू विद्यालय, आवारपूर येथून पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. बारावीचे शिक्षण महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथून घेतले. तर श्वेता इलेक्ट्रिकल अभियंता पोटे अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथून पास झाली.

हेही वाचा : चंद्रपूर : आठ तास अभ्यास, आठ तास झोप, मित्रांसोबत गप्पा आणि..; पोलीस अधीक्षक परदेशी आणि विद्यार्थ्यांमध्ये रंगल्या आयएएस होण्याच्या गप्पा

विशेष म्हणजे श्वेता वर्ग एक ते अभियांत्रिकी परीक्षा अव्वल गुणांनी पास होऊन तालुक्यातून प्रथम ठरली. महाराष्ट्र लोकसेवा आयोग ग्रुप क २०२२ ची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. श्वेता ओपन मधून २४ तर अनुसूचित जातीतुन दुसऱ्या क्रमांकानी उत्तीर्ण झाली. श्वेता परीक्षा पास झाल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या यशाबद्दल श्वेताने आई-वडील, शिक्षक वृंद, मित्र परिवार व कुटुंबियांचे आभार मानले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chandrapur shweta umre zilla parishad school student clears mpsc exam with 2nd rank in sc category and 24th rank in open category rsj 74 css