लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे बफर क्षेत्रात चंद्राच्या प्रकाशात बुद्धपोर्णिमाच्या दिवशी शुक्रवार ५ मे रोजी प्राणीगणना होणार आहे. ‘मचान स्टे’ या गोंडस नावाने प्राणीगणना कार्यक्रमात सहभागाला दोन प्रगणकांसाठी ४ हजार ५०० रुपये शुल्क आहे. यावर्षी प्रथमच प्रगणकांना ऑनलाइन नोंदणी करायची आहे.

अटी व शर्तींचे पालन करून पूर्णपणे निरोगी असलेल्या प्रगणकांचीच निसर्ग दर्शनासाठी निवड केली जाईल. ताडोबा बफर क्षेत्रात ५० ठिकाणी निसर्ग दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा… वर्धा : आमदार व सहकार नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, आज बाजार समितीसाठी मतदान

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पत दरवर्षी चंद्रप्रकाशात प्राणीगणना कार्यक्रम राबविला जातो. यावर्षी कोर झोन वगळून बफर क्षेत्रात हा कार्यक्रम ५ मे राेजी राबविण्यात येणार आहे. बुद्धपौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात ताडोबा-वर्षातही प्राणीगणना होणार आहे. याबाबत ऑनलाइन पद्धतीने प्रगणक निवडीपासून ५० ठिकाणी मचान स्टे पद्धत राबविण्यात आली आहे. निसर्ग दर्शनात सहभागी होणाऱ्या पर्यटकांकडून ४ हजार ५०० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. या शुल्कावर दोन प्रगणकांना प्रवेश दिला जाणार आहे.

हेही वाचा… धक्कादायक! दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार, नागपूर जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्न

एका मचानवर दोन पर्यटक व एका गाईडला बसविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ४ हजार ५०० रुपयांमध्ये प्रगणकाला फक्त मचानपर्यंत जिप्सीने सोडून दिले जाणार आहे. पाणी, दोन वेळचे जेवण तथा इतर सर्व व्यवस्था पर्यटकाला स्वत: करायची आहे. प्रथमच शुल्क आकारण्यात आले असले तरी ताडोबा बफर क्षेत्रात ऑनलाइन नोंदणी जवळपास हाऊसफुल्ल झाली आहे. ज्यांना ऑनलाइन नोंदणी मिळाली नाही अशांना साडेचार हजार रुपये शुल्क आकारून ऑफलाइन नोंदणीसुद्ध केली जात आहे. मागील काही घटनांचा वाईट अनुभव बघता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापन यावेळी निसर्ग दर्शनात विशेष खबरदारी घेत आहे.

हेही वाचा… अकोला : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील १६५ मचाणांवर ‘निसर्ग अनुभव’; बुद्धपौर्णिमेला प्राणीगणना, आजपासून ऑनलाइन नोंदणी

यावेळी झाडांऐवजी लोखंडी आणि स्टीलचे मचान बनवण्यात आला आहे. जे नैसर्गिक आणि कृत्रिम जलस्रोतांच्या जवळ आहे. मूल वनपरिक्षेत्रातील फुलझरी, वानरचुआ, जानाळा तलाव, शिवणीतील चावरदंड, कुकरहेट्टी, पिपरहेटी, पांढरपौनी तलाव, मोहुर्ली येथील सिमेंट टाकी, इरई धरण, वन तलाव, फेटाबोडी, आगरझरीतील देवडा वन तलाव, अडेगाव, जोडटोहा नाला, इरई धरण. आंबेझरी, पद्मापूरमधील वाढोली इरई धरण, पलसगाव, मदनापूरमधील कमकझरी, बोअरवेल खोड तलाव, फुटकी बोडी. जुनाबाई पानवठा, दाभोरी तलाव, वनसंरक्षण कुटी, आनंदवन तलाव, चंद्रपूर मधील गोवरझरी, चोरगाव, खडसांगी येथील झरण आदी ठिकाणी मचान तयार करण्यात येणार आहेत.

गतवेळेप्रमाणे यंदाही अतिशय कडक नियम घालण्यात आले आहेत. सर्व प्रगणकांनी या नियमांचे पालन केले पाहिजे असे निर्देश ताडोबा व्यवस्थापनाने दिले आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील चंद्रपूर, खडसांगी, मूल, शिवणी, मोहुर्ली आदी वनक्षेत्रातील मचानांवर ही प्रगणना केली जाणार आहे.

मचान प्रगणना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मागील दोन तीन वर्षापासून शुल्क आकारले जात आहे. साडेचार हजार रूपये शुल्क योग्य आहे. बुध्द पोर्णिमेला प्रगणकांची गर्दी असते. त्यांना त्यांचे खासगी वाहन मचान पर्यत घेवून जाण्यास मनाई आहे. अशा वेळी ताडोबातील जिप्सी चालकांची मदत घेतली जाते. जिप्सी चालकांना या माध्यमातून रोजगार मिळतो. त्यामुळे मचान स्टे साठी घेतले जाणारे शुल्क केवळ जिप्सी चालकांनाच मिळणार आहे. त्यामुळेच हे शुल्क आकारले आहे. – कुशाग्र पाठक, उपसंचालक, ताडोबा बफर क्षेत्र

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chandrapur there will be machan stay in tadoba project and tourists will be charged 4500 rupees rsj 74 dvr
Show comments