चंद्रपूर : गडचिरोली जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून जंगली हत्ती आणि वाघाच्या हल्यात वाढ झाली आहे. काँग्रेसने वेळोवेळी निवेदन देवून उपाययोजना करण्याची मागणी लावून धरली होती. मात्र, कुठल्याही प्रकारचे ठोस पाऊले उचलल्या गेली नसल्याने, गडचिरोली जिल्हा काँग्रेस समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात थेट वनमंत्र्याच्या गृह जिल्ह्यात येत रानटी हत्ती आणि नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी आंदोलनात आमदार सुभाष धोटे, आमदार सुधाकर अडबाले, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, जि. प. माजी उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिला काँग्रेस अध्यक्ष ऍड. कविता मोहरकर, चंद्रपूर शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, काँग्रेस नेते दिनेश चोखारे, नेताजी गावतुरे यांच्यासह हजारोच्या संख्येने शेतकरी, महिला, काँग्रेस, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : धक्कादायक! खंडणी न दिल्यामुळे धावत्या रेल्वेसमोर फेकले…

जंगली हत्ती आणि नरभक्षक वाघांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, हत्ती, वाघ किंवा अन्य कोणत्याही वन्यप्राण्याच्या हल्यातील जखमी व मृत व्यक्तीच्या कुटुंबास तातडीने भरवी आर्थिक मदत करण्यात यावी, निष्पाप नागरिकांचा जीव गेल्यास वनअधिकाऱ्यांना भादवी ३०२ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे, जंगली प्राण्याच्या हल्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट २५ हजाराची आर्थिक मदत करण्यात यावी, वनपट्याचे प्रलंबित मागण्या निकाली काढून वनपट्टे व सातबाऱ्याचे वितरण करण्यात यावे. सुरजागड येथे होणाऱ्या अवैद्य वृक्षतोडीची चौकशी करून संबंधित कंपनीवर कारवाही करण्यात यावी, शेतांच्या संरक्षणासाठी चेनलिंग फेन्सिंगची व्यवस्था करण्यात यावी,रोजगार निर्मितीच्या दृष्टीकोनातून कमलापूर सह जिल्ह्यातील वन पर्यटन स्थळांचा विकास करण्यात यावा, गडचिरोली जिल्ह्यातील वनविभागातील रिक्त पदांची तातडीने भर्ती करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

हेही वाचा : गुन्हे शाखा कार्यालयात शिरला साप; पोलीस अधिकाऱ्याने…

वनमंत्र्यांचे शिष्टमंडळाला बैठकीचे निमंत्रण

आज वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयासमोर चंद्रपूर येथे झालेल्या ठिय्या आंदोलना दरम्यान आमदार सुभाष धोटे, आमदार सुधाकर अडबाले यांनी भेट दिली. आमदार सुभाष धोटे यांनी वनमंत्री यांच्या सोबत भ्रमनध्वनी द्वारे संभाषण केले असता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळास बैठकीकरीता ११ डिसेंबर, २०२३ रोजी, नागपूर येथे बोलावले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chandrapur thousands of farmers of gadchiroli protesting for demand to control wild elephant and tiger rsj 74 css