चंद्रपूर : कोठारी येथील देवानंद कुमरे, साईनाथ भोयर आणि विजय साखरकर हे पेंटिंगची कामे करतात. गेल्या काही दिवसांपासून कोठारीपासून जवळच असलेल्या देवई या गावात त्यांचे घरगुती रंगकाम करण्याचे काम सुरू होते. या कामासाठी तिघेही सकाळी दुचाकीने जायचे.
मंगळवार (ता. २४) सकाळी गावाहून दुचाकीने देवई गावाला जाण्यासाठी निघाले. एफडीसीएम झरण जंगल कक्ष क्रमांक १०४ परिसरातून ते दुचाकीने जात होते. याचदरम्यान जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झडप घेत हल्ला केला. यात दुचाकीवर बसलेले देवानंद कुमरे (वय ४३), साईनाथ भोयर (वय ३३) आणि विजय साखरकर (वय ४१) हे जखमी झाले.
हेही वाचा : MPSC Exam: एमपीएससीची संयुक्त परीक्षेची जाहिरात रखडली, काय आहे कारण जाणून घ्या…
जखमी अवस्थेत त्यांनी आरडाओरड सुरू केली. यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला. रस्त्याने ये-जा करणाऱ्यांनी रस्त्यावर पडून असलेल्या तिघांनाही कोठारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तेथे तिन्ही जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा : ‘तुमचे नुकसान भरून काढू, पण एक दिवस सुट्टी घेऊ द्या’, शिक्षक करताहेत विनंती
घरगुती रंगकामासाठी दुचाकीने जात असलेल्या तिघांवर बिबट्याने झडप घेतली. यात दुचाकीवरील तिघे जखमी झाले. ही घटना मंगळवार (ता. २४) कोठारी ते देवई मार्गावर घडली. जखमींमध्ये देवानंद कुमरे, साईनाथ भोयर आणि विजय साखरकर यांचा समावेश आहे. तिघांनाही चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहेत.