चंद्रपूर : ताडोबाच्या बफर क्षेत्रातील बोर्डा बिटातील घंटाचौकीजवळील एका खासगी जागेत पूर्ण वाढ झालेल्या टी-५१ या वाघाचा मृतदेह आढळल्याने वनविभागामध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, वाघाच्या संपूर्ण शरीरावर जखमा आढळल्या असून रक्तस्त्रावामुळे वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. शरीरावर जखमा आढळल्याने शिकारीचा संशयही बळावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : रामदास आठवलेंची ॲड. प्रकाश आंबेडकरांना मंत्रिपदाची ऑफर, ‘या’ ठेवल्या अटी…

वनविभागाचे पथक घंटाचौकी परिसरात गस्त करीत असताना त्यांना खासगी जागेत मृत वाघ आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होवून मृतदेह ताब्यात घेत पाहणी केली. शवविच्छेदनानंतर वाघाचे दहन करण्यात आले आहे. वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण कळावे यासाठी वाघाचे अवयव प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chandrapur tiger found dead at buffer zone of tadoba andhari tiger reserve rsj 74 css