चंद्रपूर: चंद्रपूर वनविभागा अतंर्गत चिचपल्ली परिक्षेत्रातील जानाळा, कांतापेठ, चिरोली, कवडपेठ, चिचाळा, ताडाळा परिसरात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर घडल्या. चार ते पाच गुराख्यांचा वाघिणीने बळी घेतला. या टी ८३ वाघिणीला शनिवार २८ सप्टेंबर रोजी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास जेरबंद करण्यात यश आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मानव वन्यजीव संघर्ष व गुरख्यांचे बळी लक्षात घेता मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त, डॉ. जितेंद्र रामगावकर यांचे सूचनेनुसार आनंद रेड्डी, उपसंचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर चंद्रपूर व प्रशांत खाडे, विभागीय वन अधीकारी, चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर, तसेच व्ही. एस. तरसे, सहाय्यक वनसरंक्षक (तेंदु), चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर वाटोरे, सहाय्यक वनसंरक्षक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली चिचपल्ली वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या जानाळा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ७१७ मध्ये वाघिणीला प्रियंका आर. वेलमे, वनपरिक्षेत्र अधिकारी चिचपल्ली (प्रादे) तसेच राहुल कारेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, बफर मुल आणि डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, राकेश आहुजा, बायोलॉजिस्ट ब्रम्हपुरी यांच्या नेतृत्वात अजय मराठे, शार्प शुटर यांनी यशस्वीरित्या बेशुध्द करुन वाघिणीला जेरबंद करण्यांत आले.

हेही वाचा : अकोला : अतिवृष्टीमुळे ५७ हजार हेक्टरवरील पिके मातीत; ऐन सणासदीच्या काळात….

सदर मोहिमेत शपी. डी. खनके, क्षेत्र सहाय्यक महादवाडी, एन. डब्ल्यु. पडवे, क्षेत्र सहाय्यक केळझर, एम. जे. मस्के, क्षेत्र सहाय्यक मूल,. राकेश गुरनुले,’ वनरक्षक जानाळा, एस. आर. ठाकुर, वनरक्षक मूल, शीतल व्याहाडकर, वनरक्षक चिचाळा, कु. शुभांगी गुरनुले, वनरक्षक दहेगांव अती., सविता गेडाम, वनरक्षक चिरोली, पवन येसांबरे, वनरक्षक महादवाडी, जि. जे. दिवठे, वनरक्षक पिंपळखुट एस.एस. बावणे, वनरक्षक गिलबीली २ तसेच आर. आर. टी. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर मधील विकास ताजणे, योगेश लाकडे, प्रफुल्ल वाडगुरे, गुणांक ढोरे, दिपेश टेभुर्णे, वसीम शेख, अमोर कोरपे, अक्षय दांडेकर आणी चिचपल्ली परिक्षेत्रातील वनमजूर यांनी मोलाचे सहकार्य केले. डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर व त्यांच्या चमुने आत्तापर्यत मानव वन्यजीव संघर्ष प्रकरणातील ७१ वाघ यशस्वीरित्या जेरबंद केले, ही एक उल्लेखनिय बाब आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chandrapur tiger who killed five cowherds caged by forest department rsj 74 css