चंद्रपूर : नागपूर कराराद्वारा २८ सप्टेंबर १९५३ रोजी विदर्भ महाराष्ट्रात समाविष्ट झाला. मात्र या सत्तर वर्षात या कराराद्वारे देण्यात आलेली आश्वासने पाळली नाही. यामुळे विदर्भात अनेक ज्वलंत समस्या निर्माण झाल्या. याचा निषेध करण्यासाठी आणि आता स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, या मागणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यात नऊ स्थानांवर समिती आणि नागरिकांनी या विदर्भ कराराची होळी करून संताप व्यक्त केला. चंद्रपूर येथील जेटपूरा गेट येथे गांधी पुतळ्यासमोर विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲड. माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वात नागपूर कराराची होळी करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येथे समितीचे जिल्हाध्यक्ष किशोर दहेकर, अंकुश वाघमारे, मुन्ना आवळे, पुंडलिक गाठे, नितीन भागवत यांचेसह मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी सहभागी झाले. चिमूर येथे डॉ.रमेश गजबे, स्थूल सर, नागदेवते ,पंकज गायकवाड,रवि ढोले,संजय वाकडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांनी नागपूर कराराची होळी केली. राजुरा येथे विद्या आंदोलन समितीचे ॲड. अरुण धोटे, आरपीआय नेते सिद्धार्थ पठाडे, बार असोसिएशन अध्यक्ष ॲड. राजेश लांजेकर यांचेसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.

हेही वाचा : कुणबी समाजाचा बहिष्कार; तरीही सरकारने ओबीसींची बोलावली बैठक

गोंडपिपरी येथे रूपेश सूर, ॲड. प्रफुल आस्वले, शंकर पाल,रविंद्र हेपट यांनी नागपूर कराराची होळी केली. कोरपना येथे अरुण नवले, रमाकांत मालेकर, अविनाश मुसळे,बंडू राजुरकर यांनी नागपूर करार जाळून आंदोलन केले. जिवती येथे शब्बीर जागीरदार, सय्यद इस्माईल, विनोद पवार, देविदास वारे, उद्धव गोताबळे यांनी नागपूर कराराची होळी केली.

हेही वाचा : गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या…

‘विदर्भ हा नैसर्गिक दृष्ट्या संपन्न क्षेत्र असून गेल्या सत्तर वर्षात विदर्भावर सतत अन्याय झाला आहे. विदर्भातील प्रश्नाकडे सतत दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळेच येथे शेतकरी आत्महत्या, कुपोषण,बेरोजगारी, सिंचन अनुशेष, नक्षलवाद, प्रदूषण, बालमृत्यू यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे नागपूर करार हे विदर्भावरील अन्यायाचे प्रतीक असल्याने आज विदर्भातील सर्व जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यात या नागपूरची होळी करण्यात आली आहे’, असे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲड. वामनराव चटप यांनी म्हटले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chandrapur vidarbha state movement committee burns nagpur agreement demands separate vidarbha state rsj 74 css