चंद्रपूर : ७० कोटी खाल्लेला बारामतीचा पोपट बनला आहे. महाराष्ट्र सदन बांधला सुंदर आणि भुजबळ गेला अंदर. भ्रष्टाचाराच्या आरोपात अंदर झालेले आता बंदर बनून मांडीवर बसले आहेत. मांडीवर बसलेले हे बंदर आता पोपट बनून बोलायला लागले आहेत, अशी टीका राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रीमंत देवाजी बापू खोबरागडे यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात वडेट्टीवार बोलत होते. यावेळी वडेट्टीवार यांनी चोफेर टोलेबाजी करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. ७० हजार कोटी खाल्यानंतर बारामतीचा मीटू आता पोपट झाला आहे. खासदारांची स्थिती गुलामासारखी झाली आहे. ते काहीच बोलू शकत नाही. देवाजी बापू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजाभाऊ खोबरागडे यांच्या काळातही मतभेद होते. मतांतरे होती, मात्र विचार लोकशाहीसाठी होता. स्वातंत्र्य टिकण्यासाठी व स्वातंत्र्यासाठी होता. उपेक्षितांसाठी या सर्वांनी लढाई केली. मात्र, आज यांच्या लेखी दलित, उपेक्षित, बहुजन नाही, तुम्हा आम्हा सर्वांना गुंडाळून मनुवादी विचारांचा देश उभा करण्याचे काम सुरू झाले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा : नागपुरातील ११६ लाचखोर अधिकारी-कर्मचारी जाळ्यात, वर्षभरात अवघे ७५ सापळा कारवाई

माझ्यासाठी, पक्षासाठी मत द्या, यासाठी मी बोलत नाही…

मी देव पाहिलेला नाही, मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपात मला देव भेटला. मी इथं पर्यंत पोहचलो, ही त्यांची पुण्याई. जर तुम्ही पुन्हा चूक कराल तर नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही. मी माझ्यासाठी, माझ्या पक्षासाठी मत द्या यासाठी हे बोलत नाही. संविधान आणि लोकशाही वाचवण्याची ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे आवाहन वडेट्टीवार यांनी यावेळी केले.

हेही वाचा : खारपाणपट्ट्यातील ‘जिगाव’मध्ये दीड वर्षांत ‘सिंचन’; अधिकच्या खर्चाला मंजुरीने कामाला वेग

कुणाची जात काढू नये, पण…

कुणाची जात कधी काढू नये. पण कधीकधी काढावी लागते. सत्ता, संपत्ती काही मर्यादित लोकांच्या हातात गेली आहे. देशातील वातावरण दूषित झालेलं आहे. जाती-जातीत, धर्मा-धर्मात लढविण्याचे काम सुरू आहे. २०२४ ची लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची असणार आहे. मी बाळासाहेब आंबेडकराना विनंती करतोय, सर्व बहुजनांन आता एक व्हावे लागेल, नाही तर ते सर्वात आधी आमचा बंदोबस्त करतील. या देशात गुजराती, मारवाडी आणि तीन टक्के लोकसंख्या असलेल्यांचीच सत्ता आहे. तुम्ही-आम्ही काही नाही. ते हो म्हणतील तर हो म्हणा, नाही म्हणतील तर नाही म्हणा, अशी स्थिती निर्माण झाली आहे, अशी खंतही वडेट्टीवार यांनी बोलून दाखविली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chandrapur vijay wadettiwar criticises ajit pawar for irrigation scam of 70000 crores rsj 74 css