नागपूर : देशातील काही भागात थंडीची तीव्र लाट असून किमान तापमान आठ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. दरम्यान, येत्या काही दिवसात रात्रीच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. उत्तर भारतात थंडी आणि दक्षिण भारतावर पावसाचे सावट असताना हवामान खात्याने देशाच्या मध्यवर्ती भागात थंडीची लाट येईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा… अमरावती शहरातील अनेक पेट्रोल पंप बंद; काही ठिकाणी लांबच लांब रांगा

हेही वाचा… उपराजधानीत पाच वर्षात १०९३ महिलांवर बलात्कार; गृहमंत्र्यांच्या शहरात महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

आजपासून पुढील तीन दिवस उत्तर-पश्चिम आणि पूर्व भारताच्या काही भागात दाट धुके राहण्याचा देखील अंदाज वर्तवला आहे. उत्तर भारतात आधीपासूनच थंडी असताना आता पुन्हा त्याठिकाणी थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक राज्यांमध्ये पाऱ्यात वेगाने घसरण होऊन कडाक्याची थंडी पडत आहे. पंजाब आणि हरियाणातील किमान तापमान सर्वाधिक वेगाने कमी होत असून मंगळवारी पंजाब या राज्यात सर्वाधिक कमी म्हणजे सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. आता मध्य भारतात जानेवारीत थंडी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.