अमरावती : दर्यापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्ष आणि युवा स्‍वाभिमान पक्ष समोरा-समोर आल्‍याने महायुतीत फूट पडल्‍याचे चित्र आहे. युवा स्‍वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांनी प्रचार पत्रकांवर भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष आणि खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्‍या छायाचित्रांचा वापर सुरू केल्‍याने भाजपच्‍या पदाधिकाऱ्यांनी त्‍यावर आक्षेप घेत कारवाईचा इशारा दिला आहे.

बडनेराचे आमदार रवी राणा यांना भाजपने पाठिंबा दिला असला, तरी त्‍यांनी दर्यापूर मतदारसंघात भाजपमध्‍ये बंडखोरी घडवून आणली. भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले यांना युवा स्‍वाभिमान पक्षाची उमेदवारी दिली. त्‍यामुळे पेचप्रसंग उभा ठाकला. दर्यापूरमधून शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी दिली. पण, अडसूळ हे रवी राणांचे कट्टर विरोधक. अडसुळांना उमेदवारी मिळू नये, यासाठी भाजपच्‍या माजी खासदार नवनीत राणा यांनी जंग-जंग पछाडले. पण महायुतीच्‍या राजकारणात उमेदवारी मिळवण्‍याचा डाव अभिजीत अडसूळ यांनी जिंकला. नवनीत राणा यांना अडसूळ यांनी विरोध केला होता. सूडाच्‍या राजकारणातून रवी राणा यांनी दर्यापुरात खेळी केली असली, तरी त्‍याचे पडसाद आता उमटू लागले आहेत.

Amar Kale says our fight is not with Sumit Wankhede or Dadarao Keche fight is with Devendra Fadnavis
वर्धा : ‘माझी लढत देवेंद्र फडणवीस यांच्याशीच’ या खासदारांच्या वक्तव्याने…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sanjay Raut slams Raj Thackeray (1)
Sanjay Raut: ‘राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे माफ करणार नाहीत’, प्रॉपर्टीच्या विधानावरून संजय राऊत यांची टीका
In Akola vanchit Bahujan Aghadi Zeeshan Hussain application withdrawn from election
वंचितला मोठा धक्का…अधिकृत उमेदवाराची माघार…आता काँग्रेसला…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
tejas Thackeray
माजी मुख्‍यमंत्र्यांचे चिरंजीव चक्क सामान्‍यांच्‍या खुर्चीत! वलगावातील सभेत…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

हेही वाचा… फडणवीस, बावनकुळे, केदार, देशमुखांसह २१७ रिंगणात

माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी डॉ. अनिल बोंडे यांच्‍या माध्‍यमातून युवा स्‍वाभिमान पक्षाने निवडणूक रिंगणातून माघार घ्‍यावी, यासाठी प्रयत्‍न करून पाहिले, पण त्‍यात त्‍यांना यश आले नाही. युवा स्‍वाभिमान पक्ष जिल्‍ह्यात बडनेरा आणि दर्यापूर या दोन ठिकाणी निवडणूक लढवित आहे.

हेही वाचा…यवतमाळ जिल्ह्यात बाजोरीया, नाईक, उकंडेंसह ७७ जणांची माघार…आता मैदानात…

भाजपचा कारवाईचा इशारा

रमेश बुंदिले यांनी भाजपच्‍या अनेक‍ पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात न घेता युवा स्‍वाभिमान पक्षात प्रवेश घेतला. त्‍यांच्‍यासोबत भाजपचे काही पदाधिकारी प्रचार करताना फिरत आहेत. आम्‍ही उमेदवारी अर्ज मागे घेण्‍याच्‍या अखेरच्‍या दिवसापर्यंत वाट पाहिली, पण आता महायुतीच्‍या उमेदवाराच्‍या विरोधात प्रचार करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित करण्‍यात येईल. रमेश बुंदिले यांनी भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. अनिल बोंडे यांची परवानगी न घेता प्रचार पत्रके आणि फलकांवर त्‍यांचे छायाचित्र वापरले असल्‍याने रमेश बुंदिले यांच्‍या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्‍यात येईल, असे भाजपचे दर्यापूर विधानसभा प्रमुख गोपाल चंदन यांनी सांगितले.

भाजपचे बहुसंख्‍य पदाधिकारी हे महायुतीचे उमेदवार अभिजीत अडसूळ यांचा प्रचार करीत आहेत. भाजपच्‍या काही कार्यकर्त्‍यांची दिशाभूल करण्‍यात आली आहे, केवळ ते रमेश बुंदिले यांच्‍या सोबत आहेत. अशा लोकांवर कारवाई करण्‍यात येणार आहे, असे गोपाल चंदन यांचे म्‍हणणे आहे.

Story img Loader