नागपूर : पूर्व विदर्भात पुन्हा ‘डेंग्यू’ने डोके वर काढले आहे. १ जानेवारी ते ३१ मे २०२३ दरम्यान येथील सहा जिल्ह्यांत ६० रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी सर्वाधिक ३९ टक्के रुग्ण हे केवळ नागपूर जिल्ह्यातील आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयाच्या माहितीनुसार, नागपूरच्या शहरी भागात गेल्या पाच महिन्यांत १७, ग्रामीणला ६ असे एकूण जिल्ह्यात २३ ‘डेंग्यू’ग्रस्त आढळले. तर गोंदिया जिल्ह्यात १४, चंद्रपूरला ९, गडचिरोलीत ११, वर्धेत ३ रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्णांपैकी निम्मे रुग्ण हे गेल्या अडीच महिन्यातील आहे.
हेही वाचा – संपूर्ण योग ग्रामसाठी महाराष्ट्रातून निवडलेले एकमेव गाव आहे कसे?
पूर्व विदर्भात ‘डेंग्यू’ग्रस्त रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागात चिंता वाढली आहे. ‘डेंग्यू’चे रुग्ण वाढू नये म्हणून नागपूर महापालिका आणि जिल्हा परिषदेकडून पाणी साचत असलेल्या भागात कीटकनाशक फवारणी, जनजागृतीसह इतर उपाय केले जात असल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.