नागपूर : बंगळुरूवरून विकत आणलेल्या १२ वर्षीय मुलीच्या गुप्तांगाला सिगारेटचे चटके देऊन पती आणि भाऊ लैंगिक शोषण करीत असल्याची माहिती हिना खान हिला होती. मात्र, तिनेच मुलीला दम देऊन गप्प राहून त्यांची मर्जी राखण्यासाठी बाध्य केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तहा अरमान खान आणि अझहर शेख अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
हिना खान आणि भाऊ अझहर शेख यांनी चौकीदाराला ५० हजार रुपये देऊन १२ वर्षीय मुलीला घरकाम करण्यासाठी विकत घेतले होते. गेल्या चार वर्षांपासून ती मुलगी हिना खानच्या घरी काम करीत होती. हिनाला दोन वर्षांची आणि ८ महिन्यांची मुलगी आहे. तिला पुरेशी विश्रांती मिळावी म्हणून तीसुद्धा मुलीला तवा आणि सराट्याने चटके देऊन काम करवून घेत होती.
पती तहा अरमान खान आणि भाऊ अझहर शेख हे दोघेही त्या मुलीचे बेडरुममध्येच लैंगिक शोषण करीत होते. मुलीशी हिनासमोर अश्लील चाळे करीत होते. मुलीच्या गुप्तांगाला सिगारेटचे चटके देऊन लैंगिक अत्याचार होत असताना मुलीचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून हिना टीव्हीचा आवाज मोठा करीत होती. मुलीच्या शरीराची वाढ व्हावी, यासाठी अनेकदा हिनानेच ‘हार्मोन्स’चे इंजेक्शन विकत आणले होते, अशी धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली.
बाथरूममध्ये कोंडून ठेवून तिला ब्रेडचे पाकिटे ठेवून ८ ते १० दिवस बंगळुरुला जाण्यापूर्वी हिना बाथरुममधून आवाज बाहेर जाऊ नये म्हणून मुलीला दम देत होती. हिनाच्या दहशतीमुळे मुलगी बाथरुममध्ये जेवन आणि झोपत होती.
हेही वाचा – भुसावळ – नागपूर पॅसेंजर तीन वर्षांपासून बंदच; प्रवाशांचे हाल
आरोपींनी ‘व्हिआयपी’ वागणूक?
हुडकेश्वर पोलिसांकडून दोन्ही आरोपींना ‘व्हिआयपी’ वागणूक मिळत आहे. समाजमाध्यमावर आरोपीचे छायाचित्र प्रसारित झाल्याने हुडकेश्वर पोलिसांची पोलखोल झाली. आरोपी अझहर हा पोलीस अधिकाऱ्याच्या टेबलजवळ बसून पोलीस उपनिरीक्षक राठोड यांच्या मोबाईलवरून नातेवाईकांशी बोलत होता. आरोपीला हॉटेलातून जेवण मागविण्यात येत आहे. दररोज त्याला भेटायला कारने काहीजण येतात, असा आरोप नागरिकांचा आहे. संवेदनशील प्रकरण असतानाही आरोपींबाबत हुडकेश्वर पोलीस सहानुभूती दाखवत आहेत. मात्र, इतके असतानाही ठाणेदार जग्वेंद्रसिंह राजपूत यांनी सर्व आरोप फेटाळले आहे.