गडचिरोली : अहेरी तालुक्यातील माहागाव या गावी एकाच कुटुंबातील लागोपाठ पाच जणांच्या गूढ मृत्यूने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या मृत्यूसत्राचा उलघडा करण्यात अखेर पोलिसांना यश आले असून सून आणि मामीला पाच जणांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सासरच्या छळाला कंटाळून सुनेने तर संपत्तीच्या वादातून मामीने मिळून हे पाऊल उचलले. या दोघींनी अन्न व पाण्यातून विष देत थंड डोक्यानी हे हत्याकांड घडवून आणले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शंकर तिरुजी कुंभारे (५२), विजय शंकर कुंभारे, त्यांची विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर (२९,रा.गडअहेरी ता.अहेरी), मावशी आनंदा उराडे (५०, रा. बेझगाव ता. मूल जि.चंद्रपूर), मुलगा रोशन शंकर कुंभारे (२८) अशी मयतांची नावे आहेत. सून संघमित्रा रोशन कुंभारे (२५) व रोशनची मामी रोजा रामटेके (५२) या दोघींना पोलिसांनी अटक केली आहे. शंकर कुंभारे यांचे महागाव येथे टिंबर मार्टचे दुकान आहे.

हेही वाचा : “संघाचा पाया त्यागावर उभा कारण…”; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे विधान, म्हणाले…

२२ सप्टेंबरला रात्री जेवण केल्यावर विजया शंकर कुंभारे यांची तब्येत बिघडली. डोकेदुखी व उलट्या होऊ लागल्याने पती शंकर तिरूजी कुंभारे यांनी त्यांना चंद्रपूरला नेले. त्यानंतर शंकर यांचीही प्रकृती खालावली. दोघांनाही उपचारादरम्यान नागपूरला हलविले. उपचार सुरु असताना २६ रोजी शंकर तर २७ रोजी विजया यांची प्राणज्योत मालवली. ही घटना घडली तेव्हा विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर (२९,रा.गडअहेरी ता.अहेरी) माहेरी होती. प्रकृती खालावल्याने चंद्रपूरला नेताना ८ ऑक्टोबरला वाटेत तिने प्राण सोडले. शंकर कुंभारे यांचा मोठा मुलगा रोशन कुंभारे (२८) याचा १५ ऑक्टोबरला सकाळी आठ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याची मावशी आनंदा उंदीरवाडे (५०, रा. बेझगाव ता. मूल जि.चंद्रपूर) ही अंत्यविधीसाठी महागावला आली होती.

हेही वाचा : गोंदिया : शालेय पोषण आहाराची अफरातफर! अंगणवाडीच्या शेजारील वाडीत सापडली मिरची पावडरची पाकिटे

चंद्रपूर येथे खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान १४ ऑक्टोबरला मध्यरात्री तिची प्राणज्योत मालवली. लागोपाठ होणाऱ्या मृत्यूसत्रानंतर अहेरी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. उपअधीक्षक डॉ.सुदर्शन राठोड आणि पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांनी तपास सुरु केला, हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी १८ ऑक्टोबरला पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. अपर अधीक्षक यतीश देशमुख, कुमार चिंता, अनुज तारे, उपअधीक्षक डॉ.सुदर्शन राठोड उपस्थित होते.

हेही वाचा : कंत्राटी पदभरतीला उच्च न्यायालयात आव्हान, निर्णय होईपयर्यंत…

आणखी तिघांवर उपचार सुरु

सध्या रोशनच्या आई- वडिलांना दवाखान्यात नेणारा खासगी वाहनचालक राकेश अनिल मडावी ( रा.महागाव ) याच्यावर नागपूर, रोशनचा मावसभाऊ बंटी उंदीरवाडे (रा.बेझगाव ता.मूल जि.चंद्रपूर) याच्यावर चंद्रपूर व रोशनचा भाऊ राहुल हा दिल्लीत उपचार घेत आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

इंटरनेटवर शोधले विषारी द्रव

संघमित्रा कुंभारे हिने सुरुवातीला धतुरा नावाचे विषारी द्रव मागवले होते. मात्र, ते पाण्यात मिसळल्यावर हिरवा रंग झाला तसेच दर्पही येत होता. त्यामुळे तिने प्लॅन काही दिवस पुढे ढकलला. इंटरनेटवर सर्च करुन नंतर विना रंगाचे, दर्प न येणारे व हळूहळू शरीरात भिनणारे घातक द्रव परराज्यातून मागवल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.