गडचिरोली : राज्याचे उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना देखील फडणवीस यांनी गडचिरोली सारख्या मागास, दुर्गम जिल्ह्याचे पालकत्व स्वतःहून स्वीकारले. तरीही जिल्ह्यातील जनतेला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पालकमंत्र्यांचा मात्र पत्ता नाही. यामुळे संतप्त जिल्हा काँग्रेसने आज गुरुवारी शहराच्या मुख्य चौकात ‘डफडे बजाव’ आंदोलन करून फडणवीस परत या… अशी साद घातली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यातील शेतकरी, महिला, विद्यार्थी युवक विविध समस्यांनी त्रस्त आहेत. पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऊर्जा खाते असताना देखील शेतीला नियमित वीज पुरवठा नाही. रानटी हत्ती आणि वाघाच्या धुमाकुळाने शेतकरी त्रस्त आहेत. प्रशासकीय अधिकारी जिल्ह्याचे मालक असल्याप्रमाणे वागत आहेत. याकडे पालकमंत्री फडणवीस यांचे दुर्लक्ष होत असून मागील अनेक महिन्यांपासून त्यांनी जिल्ह्यात दौरा केलेला नाही. मागील आठवड्यात गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी पत्र लिहून पालकमंत्र्यांनी किमान दिवाळीच्या फराळकरिता तरी यावे असे निमंत्रण दिले होते. मात्र, पालकमंत्र्यांच्या दौऱ्याची अजूनही काही चाहूल न लागल्याने जिल्हा काँग्रेसच्या वतीने ‘पालकमंत्री फडणवीस परत या, जबाबदारी झेपत नसेल तर राजीनामा द्या’ अशी घोषणाबाजी करीत जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात इंदिरा गांधी चौकात डफडे बजाव आंदोलन करण्यात केले.

हेही वाचा : नागपूर: पोलिसांना बघून पळाल्याने चोर अडकला जाळ्यात; घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस

यावेळी प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ. चंदाताई कोडवते, जि.प. माजी उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, जि.प. माजी उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पा. नाट, शहर अध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजित कोवासे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In gadchiroli congress agitation against the guardian minister devendra fadnavis also demand of his resignation due to his non availability in gadchiroli district ssp 89 css
Show comments