गडचिरोली : तू बिनकामाची असून आमच्यावर ओझे आहेस, असे म्हणून नातवाने वयोवृद्ध आजीची काठीने मारहाण करून हत्या केली. आज शुक्रवारी चामोर्शी तालुक्यातील नवतळा येथे ही क्रुरतेचा कळस गाठणारी घटना उघडकीस आली. तराबाई पांडुरंग गव्हारे (७५) असे हत्या झालेल्या अजीचे नाव असून याप्रकरणी आरोपी नातू भाऊराव मनोहर कोठारे याला पोलिसांनी अटक केली आहे. जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात येणाऱ्या नवतळा गावात कोठारे कुटुंबीयांसोबत बऱ्याच वर्षांपासून मृत आजी ताराबाई राहत होत्या. शुक्रवारी सकाळच्या सुमारास आरोपी नातू भाऊराव हा घरी येऊन आपल्या आई वडिलांना शिवीगाळ करू लागला.

हेही वाचा : वडिलांनी आईकडून मुलाचा ताबा घेणे अपहरण नाही, उच्च न्यायालय म्हणाले…

Kishor Jorgewar, BJP Kishor Jorgewar,
चंद्रपूर : भाजपमध्ये प्रवेश करताच किशोर जोरगेवार यांचे मताधिक्य ५० हजारांनी घटले
akola west congress party workers attacked police officer after congress win
विजयी जल्लोषात पोलिसालाच धक्काबुक्की, काँग्रेसच्या विजयानंतर अकोल्यात…; धक्कादायक…
Arvi Assembly Constituency, Sumit Wankhede ,
ना भाजप ना कमळ, ओन्ली सुमित… भाजपच्या विक्रमी विजयाचा मंत्र
maharashtra Assembly Election 2024 OBC rashtriya seva sangh Mahayuti BJP wins in Vidarbha print politics news
विदर्भ: ओबीसींची ‘घरवापसी’
vidarbha vidhan sabha election 2024
विदर्भ : विदर्भात महायुतीची लाट, विरोधक भुईसपाट
Someone has hat-trick of victories in Wardha while someone has lost four times in row
वर्धा जिल्ह्यात अनोखे विक्रम! कुणाची विजयाची हॅटट्रिक तर कुणी सलग चारवेळा पराभूत
bachchu kadu and yashomati thakur reaction after loss assembly election 2024
‘भाजपने व्‍यवस्थित व्‍यूहरचना करून…’ बच्‍चू कडू पराभवानंतर म्हणाले, ‘येणारे दिवस आपलेच’
BJP won three seats while Congress and Shiv Sena Uddhav Thackeray group won one seat each in Akola
‘अकोला पश्चिम’चा भाजपचा बालेकिल्ला ढासळला

दरम्यान, जवळच बसून असलेल्या वयोवृद्ध आजीवर त्याचे लक्ष गेले. त्याने तिला तू दिवसभर घरी बसून असते, आमच्या घरचे खाते असे म्हणून काठीने मारहाण सुरू केली. भाऊरावने निर्दयपणे केलेल्या मारहाणीत आजीचा मृत्यू झाला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला असता आरोपी नातूने पळ काढला. दरम्यान, पोलिसांनी पाठलाग करून आरोपी नातू भाऊरावला ताब्यात घेतले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील करीत आहेत.