गडचिरोली : प्रशासनासह पोलिसांसमोर आव्हान निर्माण करणाऱ्या मायक्रोस्कोप चोरीप्रकरणात ‘लोकसत्ता’ने केलेल्या पाठपुराव्यानंतर भांडारपाल अशोक पवार याला निलंबित करण्यात आले. मात्र, अद्याप चोर सापडला नसल्याने तपासावर प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. जिल्हा हिवताप कार्यालयाने एप्रिल महिन्यात मायक्रोस्कोप यंत्रांची खरेदी केली होती. साठा नोंदवहीत याची नोंद घेतली होती. २२ पैकी चार नग आरोग्य संस्थांना वितरित केले होते तर १८ नग भांडार विभागात ठेवले होते. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात ते चोरीस गेले. ही बाब निदर्शनास आल्यावर गडचिरोली ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

हेही वाचा : सोलार कंपनीत स्फोट : ‘आता आम्ही कुणाच्या भरोशावर जगावं?’, आरतीच्या दिव्यांग आईवडिलांचा सवाल

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Afghan national behind Iran's plot to assassinate Donald Trump
ट्रम्प यांच्या हत्येचा कट इराणनेच रचला होता? या संदर्भात अटक झालेला फरहाद शकेरी कोण आहे?
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
fraud of One lakh with CME professor in the name of courier
कुरिअरच्या नावाखाली सीएमईच्या प्राध्यापकाची एक लाखांची फसवणूक

पोलीस अद्याप चोरापर्यंत पोहोचू शकले नाहीत. प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.पंकज हेमके यांनी या प्रकरणात भांडारपाल अशोक पवार यांच्यावर निष्काळजी व हलगर्जीचा ठपका ठेवत २१ सप्टेंबर २०२३ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली. याचा पवार यांनी खुलासाही दिला होता. परंतु आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खास मर्जीतील असल्याने भांडारपाल पवार यांची पाठराखण केल्या जात होती. ‘लोकसत्ता’ने हे प्रकरण लावून धरल्यानंतर अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार डॉ.हेमके यांनी पवार याला निलंबित केले. परंतु अजूनपर्यंत चोराचा पत्ता लागलेला नाही. विशेष म्हणजे यापूर्वीही त्याच विभागात मायक्रोस्कोप चोरीला गेले होते. त्यामुळे हे यंत्र चोरीला गेले की कागदोपत्रीच दाखविण्यात आले. अशी चर्चा आरोग्य विभाग प्राशासनात आहे.

हेही वाचा : नागपूर: भरधाव कारची झाडाला धडक, दोन ठार

चोरी की बनाव ?

हिवताप विभागातून यापूर्वीही मायक्रोस्कोप चोरी गेले होते. त्यानंतर भांडार शाखेत सुरक्षेबाबत प्रभावी उपाय आवश्यक होते, पण पुन्हा पाच लाखांचे मायक्रोस्कोप चोरीस गेल्याने खळबळ उडाली. चोरीच्या घटनेनंतर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. परंतु आजपर्यंत हे उपाय का केले गेले नाही. असा प्रश्न उपस्थित होतो आहे. दुसरीकडे आरोग्य विभागातील अधिकारी निलंबित भांडारपाल पवार याची पाठराखण करताना दिसतात. ही चोरी आहे की बनाव, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.