गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य समितीचा सदस्य तसेच गडचिरोली जिल्ह्याचा सूत्रधार नांगसू मनसू तुमरेटी उर्फ गिरीधर व त्याची पत्नी संगीता उर्फ ललिता चैतू उसेंडी या दोघांनीही शनिवारी (२२ जून) उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गडचिरोली पोलीस मुख्यालयात आत्मसमर्पण केले. दोघांवरही एकूण ५० लाखांच्यावर बक्षीस होते. यामुळे नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसल्याचे सांगितले जात आहे.

१९९६ पासून नक्षलवादी चळवळीत सक्रिय असलेल्या गिरीधरने एटापल्ली दलममध्ये सदस्य म्हणून सुरवात केली. २००२ मध्ये त्याच्यावर भामरागड दलम कमांडर म्हणून पहिल्यांदा सर्वात मोठी जबाबदारी सोपविण्यात आली. तेंव्हापासून तो गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलवादी चळवळीतील प्रमुख नेता म्हणून ओळखल्या जाऊ लागला. त्यानंतर विभागीय समिती सदस्य, कंपनी चारचा उपकमांडर पदावर काम केले. २०१५ साली नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य म्हणून नियुक्ती झाली. सोबत पश्चिम उपविभागाचा प्रमुख म्हणून नेतृत्व केले. २०२१ मध्ये झालेल्या मार्दीनटोला चकमकीत जहाल नक्षल नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्यानंतर त्याच्याकडे गडचिरोली नक्षलवादी चळवळीची सूत्रे सोपाविण्यात आली होती. तर त्याची पत्नी संगीता ही २००६ साली कसनसूर दलममध्ये प्रवेश केला होता. ती सध्या भामरागड दलममध्ये विभागीय सदस्य म्हणून कार्यरत होती. या दोघांवरही महाराष्ट्र शासनाने अनुक्रमे २५ आणि १६ लाखांचे बक्षीस ठेवले होते. तर छत्तीसगडमध्ये देखील यांच्यावर लाखांचे बक्षीस होते. मागील दोन वर्षांपासून गडचिरोली पोलिसांच्या ‘सोशल पोलिसिंग’मुळे अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. नक्षल चळवळीतील प्रमुख नेत्यांमध्ये गिरीधरचे नाव होते. त्याच्या आत्मसमर्पणाने नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसलेला आहे. यावेळी गडचिरोली विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल आणि पोलीस अधिकारी उपास्थित होते.

Aditya Thackeray eknath shinde
Aditya Thackeray : “शिंदेंच्या दोन मंत्र्यांसह आठ जणांना परत यायचं होतं, पण…”, आदित्य ठाकरेंनी सांगितलं आठवडाभरापूर्वी ‘मातोश्री’वर काय घडलं
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
ghanshyam aka chota pudhari meets nikki arbaz
Video : निक्कीला भेटण्यासाठी मुंबईत आला घन:श्याम! अरबाजला चुकून ‘या’ नावाने मारली हाक अन्…; पुढे काय घडलं?
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
Sachin Pilgaonkar
नवरा माझा नवसाचा २’ने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केल्यानंतर श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट; म्हणाली, “रॉकस्टार मला…”
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा घणाघात, “छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा मावळ्यांच्या हाती शोभून दिसतो, दरोडेखोरांच्या…”
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”

हेही वाचा : निवडणूकीत काय ‘ताल’ झाला हे सर्वांसमोर विचारा; निरीक्षक आ. प्रवीण दटकेंवर आ. दादाराव केचे संतापले

गृहमंत्र्यांनी संविधान हाती देत केला सत्कार

गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयात आत्मसमर्पित नक्षल कुटुंबाचा मेळावा भरविण्यात आला होता. यात गिरीधर आणि त्याची पत्नी संगीताने उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुख्य प्रवाहाचा मार्ग निवडला. यावेळी फडणवीस यांनी दोघांच्या हातात संविधानाची प्रत देत त्यांचा सत्कार केला. सोबतच त्यांना आत्मसमर्पण योजनेअंतर्गत शासनाकडून १५ व ८ लाख रुपयांचा सन्मान निधी देण्यात येणार आहे. यावेळी फडणवीस यांनी गडचिरोली पोलिसांचे कौतुक केले.