गडचिरोली : लोकसभा निवडणुकीदरम्यान घातपात घडवून आणण्यासाठी नक्षल्यांनी जमिनीत ६ कुकरमध्ये पुरून ठेवलेली ९ आयईडी आणि ३ क्लेमोर स्फोटके गडचिरोली पोलिसांनी नष्ट केली. नक्षलग्रस्त टिपागड टेकडी परिसरात विशेष नक्षलविरोधी पथक, केंद्रीय राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने ही कारवाई पार पाडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : दुर्दैवी! चालू कुलरला स्पर्श झाला अन् होत्याचे नव्हते झाले; विजेचा धक्का लागल्याने…

लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. निवडणुकीदरम्यान नक्षल्यांकडून होणाऱ्या हिंसक कारवाया लक्षात घेऊन यावेळी पोलिसांनी विशेष नियोजन केले होते. त्यामुळे मोठा घातपात घडविण्याच्या उद्देशाने नक्षल्यांनी टिपागड परिसरात मोठ्या प्रमाणात पुरून ठेवललेली स्फोटके तशीच होती. दरम्यान, आज सोमवारी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी नक्षलाविरोधी पथक सी ६०, केंद्रीय राखीव पोलीस दल, जलद कृती पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाला टिपागड परिसरात शोधमोहीम राबविण्याचे निर्देश दिले. यावेळी जवानांना स्फ़ोटकांनी भरलेले ६ प्रेशर कुकर, ३ क्लेमोर पाईप, गन पावडर, औषधे व इतर साहित्य आढळून आले. बॉम्ब शोधक पथकाने ९ आयईडी व ३ क्लेमोर घटनास्थळीच नष्ट केले. सर्व टीम जवळच्या पोलीस ठाण्यात आल्यानंतर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In gadchiroli naxalites assassination plot foiled by police also buried explosives destroyed ssp 89 css