गडचिरोली : जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न अधिक गंभीर झाला असून कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. साधना संजय जराते (२३ रा. कारवाफा) असे मृत महिलेचे नाव असून करवाफा प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित शिबिरात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. याप्रकरणी मृत महिलेच्या कुटुंबाने दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

८ डिसेंबरला कारवाफा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शिबीर घेण्यात आले होते. यात मृत साधना जराते यांची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्यावर कारवाफा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू होते. दरम्यान, प्रकृती खालावल्याने त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु १० डिसेंबरला मध्यरात्री साधनाची प्राणज्योत मालवली. त्यांच्यापश्चात दोन लहान मुले पोरकी झाली आहे. कुटुंबाने आरोग्य विभागावर शस्त्रक्रियेत हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला असून दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
supreme court rejects sebi penalty on mukesh ambani In rpl shares case
सर्वोच्च न्यायालयाचा मुकेश अंबानींना दिलासा; ‘आरपीएल शेअर्स’प्रकरणी ‘सॅट’च्या आदेशाला सेबीचे आव्हान फेटाळले!
sexual harassment crime victim, compensation,
लैंगिक छळाच्या गुन्ह्यात पीडितेला नुकसान भरपाईचा आदेश देणे अपेक्षित…
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…

हेही वाचा : गडचिरोली जिल्ह्यात दारु निर्मिती कारखाना होणार नाही – फडणवीस

आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर साधना जराते यांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची विदारक परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. दुर्गम भागात तर याहून बिकट स्थिती असून सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. दुसरीकडे याविषयी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांमध्ये कुठलेही गांभीर्य नसून केवळ प्रतिनियुक्ती आणि खरेदीवर त्यांचे अधिक लक्ष असल्याचे दिसून येते. परिणामी नागरिकांना जीव गमवावा लागत आहे.