गोंदिया : देवरी तालुक्यातील ग्राम पुराडा गेडेवारटोला परिसरातील शेतामध्ये एका तरुणाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत व तिथूनच ५ ते सात फुटाच्या अंतरावर एका झाडाखाली युवतीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. ही हत्या की आहे की आत्महत्या, याबाबत विविध तर्क लावले जात आहे.
हेही वाचा : बुलढाणा : चालत्या एसटी बसची दोन चाके निखळली…. पुढे जे घडले…
मृत तरुणाचे नाव श्रीकांत कापगते (२२) व मृत तरुणीचे नाव टिकेश्वरी मिरी असल्याचे ग्रामस्थांकडून पोलिसांना कळविण्यात आले आहे. सालेकसा पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपास सुरू केला आहे. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. उत्तरीय तपासणीनंतरच ही हत्या की आत्महत्या, हे स्पष्ट होईल, अशी माहिती सालेकसा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी ‘लोकसत्ता’सोबत बोलताना दिली.