गोंदिया : गोंदिया शहरात एक आठवड्यापूर्वी सोंटू (अनंत) जैन कडून कोट्यवधीची फसवणूक प्रकरण आणि क्रिकेट सट्टेबाजीत कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करणारा निरज कुमार मानकानी एका पाठोपाठ घडलेल्या या दोन घटनेमुळे गोंदिया जिल्ह्यात ऑनलाइन गेमिंग हा सर्वाधिक चर्चेचा विषय झाला. आता त्याचे नफे तोटे प्रत्येक कट्ट्यावर चर्चिले जाऊ लागले. त्यातच ऑनलाइन गेमिंग म्हणजे कौशल्याचा खेळ म्हणून गणला जात आहे. तरुण पिढीचे आयडीयल असलेले अनेक नावाजलेले दिग्गज कलाकार त्याची जाहिरात करत आहेत.त्यामुळे की काय, सद्यःस्थितीत ऑनलाइन गेमिंग झपाट्याने वाढत आहे आणि केवळ खेळ नव्हे, तर हे एक पैसे मिळवण्याचे किंवा गमावण्याचे साधन झाले आहे. गोंदियात हा प्रकार झपाट्याने वाढू लागला आहे. तरुण पिढी त्याला बळी पडत आहे. अशातूनच एक आठवडापूर्वी कर्ज बाजारीपणा आणि त्यातून नैराश्य आल्याने एका २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. यामुळे ही बाब आता गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

खेळ म्हटल्यावर जय-पराजय होणारच; पण जुगारात मद्य किंवा अन्य अमली पदार्थांप्रमाणेच मेंदूच्या ठराविक भागाला उत्तेजन मिळते. जेणेकरून त्याचे व्यसन लागण्याची शक्यता असते. प्रचलित जुगारापेक्षा ‘ऑनलाइन जुगार अधिक धोकादायक असतो. त्याचे कारण म्हणजे तो भ्रमणध्वनी वर कधीही, कोणत्याही ठिकाणी आणि कुणाच्या नकळतही खेळता येऊ शकतो. ऑनलाइन जुगारासाठी केवळ इंटरनेट आणि मोबाइल वॉलेट (भ्रमणध्वनीद्वारे ऑनलाइन पैसे हस्तांतरण करण्याची एक प्रक्रिया) किंवा क्रेडिट कार्ड यांची आवश्यकता असते. तेवढे असले की, कामाच्या ठिकाणी, प्रवासात, घरी, महाविद्यालय आदी कुठूनही ऑनलाइन जुगार खेळला जाऊ शकतो. ऑनलाइन असल्यामुळे वयाने लहान मुलेही वयाच्या मर्यादा न पाळता ही हा जुगार खेळू शकतात आणि खेळतातही. हे अधिक धोकादायक आहे.

Viral Video Shows little girls playing Bhatukali
‘खरंच खूप भारी होते ते दिवस…’ भांडीकुंडी आणली, पानांची बनवली पोळी-भाजी अन्… VIRAL VIDEO पाहून आठवेल बालपण
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Ketu Gochar 2024
Ketu Gochar 2024 : केतु ग्रहाने केला सूर्याच्या नक्षत्रात प्रवेश, ‘या’ तीन राशींना मिळणार अचानक पैसाच पैसा!
Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
Saturn margi
१५ नोव्हेंबरपासून ‘या’ तीन राशींनी राहावे सतर्क, शनिच्या चालीमुळे करावा लागू शकतो अडचणींचा सामना

हेही वाचा >>>प्रेयसीला तिचा पती मारत असल्याचे खटकले म्हणून प्रियकराने…

ग्राहकांना आकर्षित करण्याच्या हेतूने प्रारंभी हे खेळ खेळण्याची संधी विनामूल्य दिली जाते. खेळासाठी लागणारे पैसे किंवा कुपन संबंधित आस्थापनाकडून भेट स्वरूपात दिले जाते. एकदा जिंकल्यावर खेळाची चटक लागते आणि त्यानंतर ती व्यक्ती स्वतःचे पैसे व्यय करून जुगारात अडकते. गोंदिया शहरात बोगस गेमिंग अप चालविणारे देखील आहेत. ते तरुणांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळत आहेत.शहरात आठवडाभरात घडलेल्या दोन घटनांतून ते समोर आले आहे. या सर्वांतून कर्जबाजारी होणे, मानसिक फसवणूक झाल्याने आरोग्य बिघडणे, एकलकोंडे होणे किंवा अगदी आत्महत्येपर्यंत पोचणेअशा घटना घडल्या आहेत. गेम खेळविणारा सोंटू जैन आणि आत्महत्या करणारा निरज कुमार मानकानी तरुण या दोन्ही बाबी आता तरुणांनी समजून घेण्याची गरज आहे.

हेही वाचा >>>पंतप्रधान, उपराष्ट्रपती, चार मुख्यमंत्र्यांसह शेकडो राजकारणी घडवणारे ‘विद्यापीठ’ झाले शंभर वर्षांचे

मेहनतीने पैसे कमविण्याकडे वळा

लालुच ही मानव स्वभावाची एक वृत्ती आहे आणि ही प्रत्येकात कमी जास्त प्रमाणात असते.त्याला हेरुंच हे करण्यात येत आहे. तरूण पिढीने कमी कालावधीत अधिक पैसे कमावण्याचा नाद सोडून मेहनतीच्या बळावर पैसे कमावण्याकडे लक्ष दिल्यास असे प्रकार घडणार नाही. त्याकरिता पालकांनी लहानपणापासून आपल्या मुलांच्या मनावर ते बिंबविणे गरजेचे आहे. – डा. साजिद खान, मानसोपचार तज्ज्ञ, गोंदिया