गोंदिया : गोंदिया शहरात एक आठवड्यापूर्वी सोंटू (अनंत) जैन कडून कोट्यवधीची फसवणूक प्रकरण आणि क्रिकेट सट्टेबाजीत कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करणारा निरज कुमार मानकानी एका पाठोपाठ घडलेल्या या दोन घटनेमुळे गोंदिया जिल्ह्यात ऑनलाइन गेमिंग हा सर्वाधिक चर्चेचा विषय झाला. आता त्याचे नफे तोटे प्रत्येक कट्ट्यावर चर्चिले जाऊ लागले. त्यातच ऑनलाइन गेमिंग म्हणजे कौशल्याचा खेळ म्हणून गणला जात आहे. तरुण पिढीचे आयडीयल असलेले अनेक नावाजलेले दिग्गज कलाकार त्याची जाहिरात करत आहेत.त्यामुळे की काय, सद्यःस्थितीत ऑनलाइन गेमिंग झपाट्याने वाढत आहे आणि केवळ खेळ नव्हे, तर हे एक पैसे मिळवण्याचे किंवा गमावण्याचे साधन झाले आहे. गोंदियात हा प्रकार झपाट्याने वाढू लागला आहे. तरुण पिढी त्याला बळी पडत आहे. अशातूनच एक आठवडापूर्वी कर्ज बाजारीपणा आणि त्यातून नैराश्य आल्याने एका २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. यामुळे ही बाब आता गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
गोंदिया: ऑनलाईन गेमिंग जुगारच! झटपट श्रीमंतीच्या नादात तरुणपिढीला नैराश्य व कर्जाचा विळखा
खेळ म्हटल्यावर जय-पराजय होणारच; पण जुगारात मद्य किंवा अन्य अमली पदार्थांप्रमाणेच मेंदूच्या ठराविक भागाला उत्तेजन मिळते.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-08-2023 at 12:35 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In gondia district online gaming has led to depression and debt among the youth sar 75 amy