गोंदिया : धानाचे थकीत चुकारे तत्काळ देण्यात यावे, या मागणीसाठी आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयासमोर सोमवारपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आज अखेर मागे घेतले.

आंदोलक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आमदार विनोद अग्रवाल यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी मोबाईलवर चर्चा केली. यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एक संदेश पाठवला. त्यात धानाचे थकीत चुकारे लवकरच दिले जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. याचबरोबर आमदार अग्रवाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न पुरवठा मंत्री, पणन महासंघाचे प्रधान सचिव, महासंघाचे प्रशासकीय संचालक यांच्याशीही चर्चा केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांना तत्काळ धान विक्रीचे पैसे देण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्याचे निर्देश दिले व लवकरच धानाची रक्कम देण्याचा निर्णय घेऊन शासन शेतकऱ्यांना न्याय देईल, असे आश्वासन दिले.

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Consumer centric approach harming interests of farmers
निवडणुकीपुरते  शेतकऱ्यांना चुचकारण्याचे धोरण
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
maharashtra assembly election 2024 many agricultural work disrupted due to election campaigning
प्रचारामुळे शेतीकामे ठप्प! शेतमजुरी ३००; तर राजकीय पक्षांकडून जेवणासह ४०० रुपये
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
farmers anger continues in 70 constituencies over soybean msp
७० मतदारसंघांत सोयाबीन ‘रोष’

हेही वाचा… चिमुकल्या कर्करुग्णांनी राखीतून जोडले ऋणानुबंध, मेडिकल रुग्णालयात अनोखे रक्षाबंधन

४ सप्टेंबर पर्यंत धानाचे चुकारे देण्याचे आश्वासन

४ सप्टेंबरपर्यंत थकीत चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. यामुळे आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचे शेतकरी दीपक कानसरे यांनी सांगितले.

हेही वाचा… दुर्दैवी ! रक्षाबंधनाच्या दिवशीच काळाचा घाला; मंदिरात झेंडा लावायला गेलेल्या तिघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

सोसायटी चालकांनी मोठं पाप केलं – आमदार अग्रवाल

शेतकरी उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून असतात. अशा कष्टकरी शेतकऱ्यांच्या उत्पादनाची नासाडी करणे हे सोसायटी चालकांचे मोठे पाप आहे. या प्रकरणातील दोषी संचालकांची लवकरात लवकर चौकशी करून त्यांची मालमत्ता जप्त करून त्यांच्याकडून वसुली करण्यात यावी, तसेच शेतकऱ्यांचे पैसे परत मिळेपर्यंत आपण त्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहणार असल्याचे आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले.