गोंदिया : नगर परिषदेचे माजी नगरसेवक लोकेश (कल्लू) यादव यांच्यावर आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास जीवघेणा हल्ला करण्यात आला. अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केल्याची घटना त्यांच्याच घराजवळील हेमू कॉलनी चौकात घडली. मिळालेल्या माहितीनुसार सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक लोकेश (कल्लू) यादव (४४) हे आपल्या राहत्या घरातून मोटारसायकलने बाहेर जात असताना त्यांच्यावर दोन ते तीन अनोळखी मोटारसायकलस्वार तरुणांनी गोळीबार केला. गोळीबारानंतर आरोपी पसार झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकेश यादव यांच्या कमरेला गोळी लागली आहे. परिसरात उपस्थित त्यांच्या मित्रांनी यादव यांना जखमी अवस्थेत गोंदियातील कुंवर तिलक सिंग जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील वैद्यकिय महाविद्यालयात हलवण्याचा सल्ला दिला. यानंतर त्वरित नागपूरला हलविण्यात आले. घटनेची माहिती गोंदिया शहरात वाऱ्यासारखी पसरली. लोकांनी घटनास्थळी व नंतर के.टी.एस. जिल्हा शासकीय रुग्णालयात एकच गर्दी केली होती. काही काळ संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण होते.

हेही वाचा : आमदार प्रतिभा धानोरकर, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे प्रबळ दावेदार; काँग्रेसच्या आठ इच्छुकांचे उमेदवारीसाठी अर्ज

सराफा लाईन येथील दुकाने बंद करण्यात आली होती. पोलिसांनी लगेच संवेदनशील क्षेत्रात बंदोबस्त तैनात केल्यामुळे वातावरण शांत झाले. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहे. गोळीबार करणारे आरोपी लवकरच शोधले जातील. पोलिसांची चार पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In gondia firing on uddhav thackeray shivsena former corporator lokesh yadav tense situation in city sar 75 css