गोंदिया : भाजपासोबत गेल्यानंतर प्रफुल्ल पटेलांना अहंकार आलेला आहे त्याला कारण ही आहे, सीबीआयची त्यांची ८४० कोटींची केस बंद झाली आहे. त्यामुळे आता त्यांनी काहीही बोललं तरी चालतं असं त्यांना वाटत आहे. त्यांना तर आता मिर्ची देखील गोड लागत आहे. अशा तिखट शब्दांमध्ये आमदार रोहित पवार यांनी पटेलांवर टीका केली.

Anil Deshmukh criticized BJP and amit shah
अमित शहां यांना अनिल देशमुखांचे चोख उत्तर म्हणाले,”शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारा भाजपच दगाबाज “
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Nagpur strength of uddhav Thackeray shivsena
शिवसेना ठाकरे गटाचे नागपुरात स्वबळ किती? निष्ठावानांकडे कायम दुर्लक्ष केल्याने पक्षाची घसरण
Uddhav Thackeray and rahul gandhi
इंडिया आघाडीत बिघाडी? विसंवादावरून ठाकरे गटाची काँग्रेसवर तोफ; म्हणाले, “हेवेदावे, जळमटे अन् कुरघोड्यांना…”
Ashish Shelar Criticise Sharad Pawar
Ashish Shelar : “शरद पवारांच्या पक्षाची अवस्था गाढवाच्या…”, भाजपा आमदाराची घणाघाती टीका
Sanjay Raut on MVA
Sanjay Raut on MVA: महाविकास आघाडी फुटली का? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले, “आम्ही भाजपामध्ये असताना…”
devendra fadnavis sanjay raut
“संजय राऊत रिकामटेकडे…मी नाही”, देवेंद्र फडणवीसांचा टोला
Former Shiv Sena MLA Uddhav Thackeray Sanjay Ghatge is on the way to join BJP
कागलमध्ये घाटगे विरुद्ध घाटगे

महाविकास आघाडीचे उमेदवार डा.प्रशांत पडोळे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील तेजस्वीनी लॉन येथे करण्यात आले होते. दरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना आमदार रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि भाजप पक्षावर विविध आरोप केले. ते पुढे म्हणाले प्रफुल्ल पटेलांनी जास्त अहंकार दाखवू नका, नाहीतर तुमचे बारा वाजल्या शिवाय राहणार नाही.

हेही वाचा : चंद्रपूर : जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गांवर

मी जेवढी इंग्रजी बोललो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही. असे वक्तव्य सुजय विखे यांनी केले होते. यावर रोहित पवार यांनी सुजय विखे पाटील यांच्यावर हल्ला चढवत म्हणाले “संसदेत नागरिकांचे समस्या कोणत्याही भाषेमध्ये मांडता येते त्याला भाषेची मर्यादा नाही. त्यामुळे भाषेचे मुद्दे उपस्थित करून लोकांचे जिव्हाळ्याचे मुद्दे बाजूला करत असाल तर हे योग्य नाही.

हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींची ८ एप्रिलला चंद्रपुरात सभा

एखादा शेतकरी कष्टकऱ्यांच्या घरी जाणं मी जास्त उचित समजतो : रोहित पवार

राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी चे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पवार कुटुंबीयांशी माझे नातं तुटलेलं नाही. रोहित पवार गोंदियात आले तर माझे दार त्यांच्यासाठी नेहमी उघडे आहे. असे वक्तव्य केले होते. यावर रोहित पवार प्रफुल्ल पटेल यांच्या गृह जिल्ह्यात आले असता त्यांना विचारले तर त्यांनी “मी एखाद्या शेतकरी कष्टकऱ्यांच्या घरी जाणं जास्त उचित समजतो. पवार साहेबांच्या विचारांच्या पक्के असलेल्या कार्यकर्त्यांच्या घरी मी जाईन पण तुमच्या हवेलीत जाणार नाही असे म्हणत प्रफुल्ल पटेल यांच्या आमंत्रणाला रोहित पवारांनी नकार दिला. गोंदिया – भंडारात महाविकास आघाडीचाच उमदेवार निवडून येईल असा दृढ विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.

Story img Loader